Today's Gold Silver Rate : लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्याचा भाव सुसाट, चांदीतही भरमसाठ वाढ; जाणून घ्या आजचा दर

(1st April 2024) Gold Silver Price In Maharashtra: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मार्च महिन्यात पहिल्या दहा दिवस तर शेवटच्या काही दिवसात सोन्याचा भाव सलग वाढताना दिसून आला.
Today's Gold Silver Rate, (1st April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate, (1st April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv

24k Gold Silver Rate In Maharashtra:

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मार्च महिन्यात पहिल्या दहा दिवस तर शेवटच्या काही दिवसात सोन्याचा भाव सलग वाढताना दिसून आला.

धातुंच्या किमतीत वाढ झाल्याने लग्नसराईत ग्राहकांना झटका लागला आहे. शुक्रवारी एका दिवसात सोन्याच्या भावात हजार रुपयांनी वाढ झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात ३ हजारांनी वाढ झाली तर शेवटच्या काही दिवसात १३०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोने लवकरच ७५ हजारांचा आकडा ओलांडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकन बँकांची स्थिती खराब असल्यामुळे मार्चच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढू लागले आहे. मागच्या आठवड्याभरात सोन्याचा भाव ६७ हजारांवर पोहोचला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

Today's Gold Silver Rate, (1st April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Rules Change In April 2024 : LPG सिलिंडरपासून टॅक्सपर्यंत आजपासून बदलणार हे ५ नियम, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,३७५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६९,५३० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ९३० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,६०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate, (1st April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : नवीन महिन्यात या राशींना होईल अचानक धनलाभ, प्रेमसंबंधात येईल दूरावा

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६९,३८० रुपये

  • पुणे - ६९,३८० रुपये

  • नागपूर - ६९,३८० रुपये

  • नाशिक - ६९,४१० रुपये

  • ठाणे - ६९,३८० रुपये

  • अमरावती - ६९,३८० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com