Gold Silver Rate (19th September): सोन्याचा भाव कडाडला, चांदीतही तेजी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
Gold Silver Rate In Maharashtra (19th September):
गणेशोत्सवाच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ झालेली पाहयाला मिळाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात घट झालेली पाहायला मिळाली.
सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला सोन्याच्या दरात घट झाली होती परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव वाढल्याने सोन्याचा भाव वाढला आहे. जाणून घेऊया आज किती पैसे मोजावे लागतील.
1. सोन्याचा वाढलेला भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५२० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,२१० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,३७० रुपये मोजावे लागतील. अशातच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात १६० रुपयांनी वाढ झाली आहे.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागले होते तर आज १० ग्रॅमसाठी ७४८ रुपये मोजावे लागतील. प्रतिकिलोनुसार आज चांदीच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली आहे.
3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 60,220 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,220 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,250 रुपये मोजावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.