Gold Silver Today : खुशखबर! १०० ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल २,००० रुपयांनी घसरला; चांदी सुद्धा झाली स्वस्त

Gold Silver (23 August 2024) : सोने आणि चांदी दोन्हींचा भाव आज पुन्हा एकदा कमी झालाय. चला तर मग जाणून घेऊ विविध शहरांतील आजचा भाव काय आहे.
Gold Silver (23 August 2024)
Gold Silver TodaySaam TV
Published On

सोने-चांदीचा भाव सातत्याने कमी जास्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३ हजारांच्या पुढे पोहचली होती. मात्र आता ही किंमत खाली घसरली आहे. सोने आणि चांदी दोन्हींचा भाव आज पुन्हा एकदा कमी झालाय. चला तर मग जाणून घेऊ विविध शहरांतील आजचा भाव काय आहे.

Gold Silver (23 August 2024)
Gold Silver Today (3 August 2024) : सोन्याचा भाव पुन्हा ७० हजारांच्या पार, चांदी झाली स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

22 कॅरेट सोन्याची किंमत

आज २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव २,००० रुपये आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव ६६,७५० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,४०० रुपयांवर पोहचलीये. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,६७५ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत किती?

आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत सुद्धा १,७०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा भाव ७,२८,००० रुपये इतका आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७२,८०० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,२४० रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,२८० रुपयांवर आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

आज १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,४६,२०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव आज ५४,६२० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४३,६९६ रुपये इतका आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ५,४६२ रुपये इतकी आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या आजच्या किंमती

मुंबईमध्ये

२२ कॅरेट ६,६६० रुपये

२४ कॅरेट ७,२६५ रुपये

पुणे

२२ कॅरेट ६,६६० रुपये

२४ कॅरेट ७,२६५ रुपये

जळगाव

२२ कॅरेट ६,६६० रुपये

२४ कॅरेट ७,२६५ रुपये

नागपुरात

२२ कॅरेट ६,६६० रुपये

२४ कॅरेट ७,२६५ रुपये

नाशिकमध्ये

२२ कॅरेट ६,६६३ रुपये

२४ कॅरेट ७,२६८ रुपये

अमरावतीमध्ये

२२ कॅरेट ६,६६० रुपये

२४ कॅरेट ७,२६५ रुपये

चांदीचा आजचा भाव काय?

चांदीचा आजचा भाव सुद्धा कमी झाला आहे. चांदीच्या दरांत आज ३०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज १ किलो चांदीचा भाव ८६,७०० रुपये आहे. मुंबई, पुणे यांसह अन्य शहरांमध्ये सुद्धा १ किलो चांदीचा भाव ८६,७०० रुपये इतका असणार आहे.

Gold Silver (23 August 2024)
Gold Silver Rate (21 August 2024) : सोन्याचा भाव कडाडला; प्रति तोळ्याचे दर ७३ हजारांच्या पुढे, वाचा तुमच्या शहरातील आजच्या किंमती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com