आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल होताना दिसत आहे. मागच्या दहा दिवसात सोन्याच्या दरात ११६० रुपयांनी घसरण झाली आहे. अशातच १४ फेब्रुवारीला एका दिवसात सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.
मागच्या दोन ते तीन दिवसात सोन्याच्या भावात पुन्हा ३३० रुपयांनी वाढ झाली. आज सोन्या आणि चांदीच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी देखील चांगली संधी आहे.
जागतिक बाजारात कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड US $ 2003 प्रति औंसवर व्यापार करत आहे. जो मागच्या काही तुलनेत US $ 10 ने जास्त आहे.चांदीच्या भावात देखील US $ 22.97 प्रति औंस वर वाढला होता तर मागच्या काही तुलनेत US $ 22.50 प्रति औंसवर बंद झाला होता. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव.
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७५० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,७१० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ११० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ५०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)
मुंबई- ६२,५६० रुपये
पुणे - ६२,५६० रुपये
नागपूर - ६२,५६० रुपये
नाशिक - ६२,५९० रुपये
ठाणे - ६२,५६० रुपये
अमरावती - ६२,५६० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.