ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्या-चांदीचे भाव कोसळले आहेत. पितृपक्षाचा काळ सुरु झाला असून या काळात दर घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात पडझड पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याचे भाव घसरले आहे. शनिवारी (30 सप्टेंबर) ला मुंबईत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात २२ कॅरेटसाठी ३३० रुपयांनी घसरण झाली होती. आज किती पैसे मोजावे लागणार जाणून घेऊया
1. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव किती?
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,३५० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,१९० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात २४ कॅरेटनुसार १६० रुपयांनी घसरण झाली आहे.
2. चांदीचा भाव किती?
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७३५ रुपयांनी होता तर आज १० ग्रॅमसाठी ७३० रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्या भावात प्रति किलोने ५०० रुपयांनी घट झाली आहे.
3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 58,040 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 58,040 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 58,070 रुपये मोजावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.