Gold Rate Today : सोन्याच्या दरात 'रेकॉर्ड ब्रेक' वाढ, ९१ हजार पार करत गाठला सर्वोच्च आकडा; आजचा दर काय?

Gold Rate Today Update : काल सोमवारी ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर १३०० रुपयांनी वाढला होता. या वाढीसह सोमवारी सोने दर ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला होता.
Gold reaches new high of 91 thousand 250 rs for 10 grams
Gold reaches new high of 91 thousand 250 rs for 10 gramsSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सोने दरातील वाढ सतत सुरुच आहे. आज मंगळवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एकदा वधारला आहे. आज सोने दर ५०० रुपयांनी वाढला असून १० ग्रॅमसाठीचा नवा दर तब्बल ९१,२५० रुपये या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली.

काल सोमवारी ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर १३०० रुपयांनी वाढला होता. या वाढीसह सोमवारी सोने दर ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला होता. आता मात्र आज मंगळवारी पुन्हा एकदा यात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने दराने ९१ हजारांचा टप्पा पार केला आहे. हा दर आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Gold reaches new high of 91 thousand 250 rs for 10 grams
Tragic Accident : मामाच्या गावाला जाताना काळाचा घाला; मुलाला ST बसने चिरडलं, सोन्यासारखा लेकाचा डोळ्यादेखत मृत्यू पाहून वडिलांचा आक्रोश

तर दुसरीकडे ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर ४५० रुपयांनी वाढून ९०,८०० रुपये प्रति १० ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला होता, जो काल सोमवारी ९०,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्यातील वाढ मंगळवारीही सुरूच होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबरच सोन्याने देशांतर्गत बाजारातही नवीन विक्रम केला आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदीच्या वाढत्या भीतीमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत, हेदेखील सोने दरवाढी मागे एक महत्त्वाचं कारण ठरतं आहे. दरम्यान, दुसरीकडे चांदीचा भावदेखील सतत वाढतो आहे. चांदीचा दर १,२,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. हा दर चांदीचा सर्वाच्च भाव आहे.

Gold reaches new high of 91 thousand 250 rs for 10 grams
Pune University Girls Hostel : दारुच्या बाटल्या अन् सिगरेटच्या पाकिटांचा ढीग, पुणे विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेमधील प्रकार; PHOTO Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com