Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?

Gold- Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाली तर चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?
Gold Price Today Saam Tv
Published On
  • आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८८० रुपयांनी वाढ झाली

  • १८ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति ग्रॅम ६१ रुपयांनी वाढ झाली

  • चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही

सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. रोज सोनं नवा उच्चांक गाठत आहे. अशातच आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८८० रुपयांनी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. पण सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये ८८ रुपयांनी वाढ झाली असून या सोन्याची किंमत १६,३९७ रुपये इतकी झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज १,६३,९७० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १६,३९,७०० रुपये मोजावे लागतील.

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?
Gold Prices: सोनं का महागतंय? सोनं 3 लाखांच्या पार जाणार?

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज चांगलीच वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याच्या दरात ८० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं १५,०३० रुपयांना विकले जात आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८०० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५०,३०० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८००० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १५,०३,००० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?
Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा सोने इतक्या रुपयांनी महागले; वाचा आजचे ताजे दर

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये ६१ रुपयांची वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १२,२९३ रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६१० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं १,२२,९३० रुपयांना विकले जात आहे. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६,१०० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं १२,२९,३०० रुपयांना विकले जात आहे.

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?
Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

दरम्यान, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. १ ग्रॅम चांदी आज २६० रुपयांना विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीचे दर २,६०० रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचे दर २,६०,००० रुपये इतके झाले आहे. आज चांदीच्या दरात काहीच बदल न झाल्यामुळे चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?
Gold Price Today : ग्राहकांसाठी मोठा झटका! सोन्याच्या किमतीत १९,००० रुपयांची वाढ; सोन्याचे किंमतीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com