Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज खरेदीपूर्वी जाणून घ्या दर...
Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Godl Price TodaySaam Tv
Published On
  • रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त

  • २४,२२ आणि १८ कॅरेटच्या दरात मोठी घसरण

  • चांदीचे दर देखील घसरले

  • २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ३,१६० रुपयांनी स्वस्त

  • १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार होत आहे. सोनं-चांदीचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली होती. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी घसरण झाली. तर आज चांदी देखील खरेदीची चांगली संधी आहे. १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. आज बहीण किंवा भावासाठी सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे ताजे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ३,१६० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५९,८२० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३१,६०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,९८,२०० रुपये खर्च करावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. २१ कॅरेटचे १ तोळा सोनं २,९०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,४६,५०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,६५,००० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज चांगलीच घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २,३७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१९,८७० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २३,७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,९८,७०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा सोनं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा भाव

दरम्यान, आज सोन्यासोबत तुम्ही चांदी देखील खरेदी करू शकता. चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी ५ रुपायांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २५५ रुपये द्यावे लागतील. तर १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी २,५५,००० रुपये मोजावे लागतील.

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 22k, 18k, 24k ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com