Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ३३,८०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold Silver Price Today: आज सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. खरेदी करायला जाण्यापूर्वा वाचा आजचे दर किती? आहेत...
Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ३३,८०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
Gold Silver meta ai
Published On: 
  • आज सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे

  • आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ३३,८०० रुपयांनी स्वस्त झालं

  • १ किलो चांदी १०००० रुपयांनी घसरली

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. दिवाळीपूर्वी आणि लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी स्वस्त झाल्यामुळे खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. आज १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,३८० रुपयांची घसरण झाली आहे. तर १ किलो चांदी १०,००० रुपयांची स्वस्त झाली. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत आणि चांदीचे दर काय आहेत हे वाचून जा....

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३८० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,३८,८८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३, ८०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १३,८८,८०० रुपये खर्च करावे लागतील. सोनं स्वस्त झाल्याने तुम्ही आज २४ कॅरेटच्या सोन्यात गुंतवणूक करू शकता.

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ३३,८०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल, आज स्वस्त झालं की महाग? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,१०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,२७,३०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोनं ३१,१०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे खरेदीसाठी आज ग्राहकांना १२,७३,००० रुपये मोजावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात त्यामुळे आज तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ३३,८०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate Today : सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, दिवाळीपूर्वी खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २५३० रुपयांनी स्वस्त झालं आहेत. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०४,१६० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं २५,३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १०,४१,६०० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, आज सोन्यासोबत चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी १० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी २०० रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १०,००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदी करताना ग्राहकांना २,००,००० रुपये खर्च करावे लागतील. आज सोन्यासोबत चांदीचे दागिने देखील खरेदीची चांगली संधी आहे.

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ३३,८०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate Today : दिवाळीपुर्वी सोनं-चांदीच्या किंमती वाढल्या की घसरल्या? सराफा बाजारातल्या आजच्या किंमती जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.