Gold Rate Today: सोन्यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी वाढ, प्रति तोळा ₹५०२० रूपयांनी महागलं, पाहा २२k, २४k चे आजचे दर

Gold Rate Today 21st January 2026: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. एका दिवसात सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्यात दरात विक्रमी वाढ झाल्याने खरेदीदारांची गर्दी मात्र कमी झाली आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ

सोनं प्रति तोळ्यामागे ५००० रुपयांनी महागलं

खरेदीदारांच्या खिशाला फटका

सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. कालच्या एका दिवसात सोन्याचे दर ५०२० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे ५ हजारांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात खूप तेजीत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर १,५४,८०० रुपये झाले आहेत. सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सोनं खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठा प्रमाणात घट होईल.

Gold Rate Today
Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं महागलं, वाचा २२k-२४k ची लेटेस्ट किंमत...

सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५ हजार २० रुपयांनी वाढले आहेत. आज १ तोळा सोने १,५४,८०० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅममागे सोनं ४,०१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,२३,८४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे तर ५०,२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १५,४८,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate : सोनं आवाक्याबाहेर गेलं, ४ तासात प्रति तोळा ₹२५०० नी महागले, चांदीमध्येही विक्रमी वाढ, वाचा ताजे दर

२२ कॅरेटचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर ४,६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३,६८० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,१३,५२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४६,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १४,१९,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर

१८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३,७७० रुपयांची वाढ झाली आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०१६ रुपयांनी वाढ झाली असून ९२,८८८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३७,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ११,६१,१०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे १९१०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com