Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्याची आजची किंमत किती? वाचा 18k ,22k, 24k चे दर

Gold Silver Rate Today Update News : भाऊबीजेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून प्रति तोळा २१८० रुपयांची कपात झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर तसेच चांदीचा भाव जाणून घ्या.
Gold Rate Today News
Gold Rate Today NewsAI Image
Published On: 

सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. मात्र आता सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे लग्नसराई, सण किंवा इतर शुभकार्यांसाठी सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत होते. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या किमतीत प्रति तोळा तब्बल २१८० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ३९ हजार ८०० रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या दरात झालेली ही घट ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः लग्नासाठी दागिने बनवण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबांना या घसरणीचा फायदा होऊ शकतो. सोन्याचे दर आणखी कमी होणार का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र कोणताही मोठा बदल झालेला नाही. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या १०० ग्रॅम चांदीचा दर २० हजार रुपये इतका आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, मागणी आणि पुरवठा यांसारख्या कारणांमुळे सोने चांदीच्या किमती बदलू शकतात.

Gold Rate Today News
Brain Health : तुमचा मेंदू हळूहळू कमकुवत होतोय? 'या' ९ सवयी आजच बदला; दुर्लक्ष करणं पडेल महागात

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,९८०

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,११,८४०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३९,८००

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,९८,०००

Gold Rate Today News
Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,८१५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०२,५२०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२८,१५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,८१,५००

Gold Rate Today News
Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,४८५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८३,८८०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०४,८५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,४८,५००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.