Bank Account: 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

RBI On Bank Account: तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आरबीआयच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो. असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचं सत्य काय आहे ते घ्या जाणून...
Bank Account: 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Bank Account Saam Tv
Published On

संदीप चव्हाण, साम टीव्ही

तुमचं बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एकापेक्षा अधिक बँकेत खाती असतील तर तुम्हाला दंड लागू शकतो. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण, या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं हे आपण पाहणार आहोत...

तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आरबीआयच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो. असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. याच मेसेजमुळे लाखो बँक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरंच असा कोणता नवीन नियम लागू झालाय का...? दोन खाती उघडणं गुन्हा आहे का...? असे प्रश्न बँक खातेदारांना पडू लागलेयत. शेअर मार्केटमधील पडझडीमुळे अनेक शेअरहोल्डर्स आधीच चिंतेत आहेत. त्यात हा नवीन दावा केल्याने अनेकांचं टेन्शन वाढलंय. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Bank Account: 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
RBI Repo Rate: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार; पुढच्या महिन्यात गुड न्यूज मिळणार!

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, बँकेत एकापेक्षा जास्त खातं असेल तर खातेदारावर कारवाई होऊ शकते. खातेदाराकडून दंड आकारला जाऊ शकतो. या मेसेजसोबत शक्तिकांत दास यांचाही फोटो जोडण्यात आलाय. कारण शक्तिकांत दास हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता का...? की कुणी बँक खातेदारांची दिशाभूल करतंय. याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

सध्याच्या घडीला अनेकांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत...सेविंग खातं, करंट खातं... अशी अनेक खाती वेगवेगळ्या बँकेत असतात. त्यामुळे लाखो बँक खातेदारांना याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली. याबाबत आरबीआयकडून माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने आरबीआयशी संपर्क साधला. तसेच आम्हाला पीआयबीनेही याबाबत माहिती जाहीर केल्याचं आढळून आले. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Bank Account: 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Central Bank Job: सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजर ते वॉर्डन विविध पदांसाठी भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणं गैर नाही. अधिक बँक खाती असल्यास दंड लागत नाही. व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणारा आहे. व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये. असे मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण केला जातो. काहीजण अशा मेसेजची सत्यता न पाहताच निर्णय घेतात. यामुळे नुकसान होऊ शकतं. कोणतेही मेसेज व्हायरल होत असल्यास त्याची पडताळणी करायला हवी. आमच्या पडताळणीत एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास दंड लागणार हा दावा असत्य ठरला.

Bank Account: 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Bank Rules: आजपासून बँकेच्या या ७ नियमांमध्ये मोठा बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com