Fact Check : सावधान! तुमची नोकरी धोक्यात?2030 पर्यंत नोकऱ्या संपणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा स्पेशल व्हिडीओ

Jobs at risk due to AI : 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार असा दावा केला जात आहे. परंतु, खरंच नोकऱ्या संपतील का? या दाव्यात किती सत्यता आहे? आम्ही याची पडताळणी केली आहे. चला, जाणून घेऊया काय आहे सत्य.
Fact Check Jobs at risk due to AI
Fact Check Jobs at risk due to AISaam Tv (Youtube)
Published On

Fact Check : 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. होय, 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच नोकऱ्या संपणार आहेत का...? या दाव्यात किती तथ्य आहे? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं. पाहुयात.

तुम्ही नोकरी करत असाल तर सावध व्हा. कारण, 2030 पर्यंत तुमची नोकरी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण, 2030 पर्यंत नोकऱ्याच संपून जातील असा दावा करण्यात आलाय. नोकरी म्हणजे रोजीरोटी. नोकरीच नसेल तर कुटुंब कसं सांभाळणार? पैसे आणायचे कुठून? असे प्रश्न आपल्याला पडलेच असतील. मात्र, हे नक्की काय आहे? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज!

नवीन तंत्रज्ञानामुळे 2030 पर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार. भौगोलिक-आर्थिक तणाव आणि दबाव यामुळे जगभरातील उद्योग, व्यावसायांवर परिणाम होईल. 2030 पर्यंत 9 कोटी 20 लाख नोकऱ्या संपतील. हा दावा फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्टमधून करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का.? हे जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे...त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली. यात कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होऊ शकतात पाहुयात.

कोणत्या नोकऱ्यांवर गदा येणार?

- कॅशियर आणि तिकीट लिपिक

- प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिव

- क्लीनर आणि हाऊसकीपर

- अकाउंटंट आणि ऑडिटर

- कंडक्टर, सुरक्षा रक्षक

तर कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही यावरही नजर टाकूयात...

- शेतमजूर, मजूर, लाईट ट्रक

- डिलिव्हरी सर्व्हिस ड्रायव्हर

- ट्रेड कामगार, दुकान विक्री करणारे

- कार, व्हॅन चालक, नर्सिंग व्यावसायिक

- विद्यापीठ आणि शिक्षक

Fact Check Jobs at risk due to AI
Nashik Bus Rickshaw Video : बसमधून रिक्षाला 'दे धक्का'! नाशिकमधल्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

येत्या 5 वर्षात प्रचंड वेगानं तंत्रज्ञान अवगत होईल...त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होऊ शकतो...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

- सरसकट नोकऱ्या कमी होणार नाहीत

- येत्या 5 वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होतील

- AI आणि बिग डेटा यांचाही समावेश आहे

- कमी वेळेत प्रचंड काम करण्याचं तंत्रज्ञान अवगत होईल

सरसकट नोकऱ्या जाणार नाही. बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलायला हवं. हा फक्त रिपोर्ट आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन नोकऱ्याही यासोबत नक्कीच निर्माण होतील.

Fact Check Jobs at risk due to AI
Viral Video: ट्रेनमध्ये दोन महिला भिडल्या; झिंज्या उपटल्या , कपडे फाडले तरी थांबल्या नाहीत, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com