Explainer : भारतात प्रत्येक चौथा कर्मचारी वर्षभरात असतो नव्या नोकरीच्या शोधात, कारण काय? वाचा

Explainer Jobs in India : जागतिक स्तरावर जवळपास २८ टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या विचार करु लागले आहेत. कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच कंपनी राहण्याची इच्छा नसल्याचं समोर आलं आहे.
Private Jobs?file photes
Private Jobs?file photessaam tv
Published On

Jobs in India :

जागतिक स्तरावर जवळपास २८ टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या विचार करु लागले आहेत. कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच कंपनी राहण्याची इच्छा नसल्याचं समोर आलं आहे. जगभरातील बहुतेक कर्मचारी नवीन संधीच्या शोधात असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. (Latest Marathi News)

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या रिपोर्टनुसार, भारतात मोठ्या प्रमाणात कर्मचारी नोकरी बदलण्याच्या शोधात असल्याचे समोर आलं आहे. भारतात २६ टक्के कर्मचारी किंवा प्रत्येक चौथा कर्मचारी एका वर्षात नोकरी बदलण्याचा विचार असल्याचे समोर आले आहे. यामुळे कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

Private Jobs?file photes
Sensex Closing Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सने घेतली 122 अंकांनी उसळी, नेस्लेचे गुतंवणूकदार झाले मालामाल

कर्मचारी नोकऱ्या का बदलत आहेत?

खासगी क्षेत्रातील बहुतेक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, एकीकडे महागाई वाढत आहे. मात्र,दुसरीकडे कंपनी पगारवाढ करण्यास तयार नसल्याने नव्या नोकरीच्या शोधात आहोत. कंपनीत तासंतास काम करूनही त्याचा मोबादला कमी मिळत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहे. रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची प्राथमिकता समजून घेणं गरजेचं आहे.

Private Jobs?file photes
Agriculture Irrigation Scheme: वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज केलाय; सोडत निघताच करा 'ही' गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

कर्मचाऱ्यांना मोठ्या पगारांची अपेक्षा

सर्व्हे रिपोर्टनुसार, नोकरी बदलण्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पगाराविषयी भरभरून बोलले. तसेच पगारासोबत इतर लाभ, सुविधा, लाइफस्टाईलवर त्यांनी भाष्य केलं.

नोकरी सोडण्यासाठी मॅनेजर कारणीभूत?

तत्पूर्वी, बीसीजीच्या सर्व्हेत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीसहित आठ देशांचे ११,००० कर्मचारी सहभागी होते. सर्व्हेमध्ये कर्मचाऱ्यांनी २० हून अधिक गरजांविषयी माहिती दिली. तसेच बहुतेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मॅनेजरप्रति राग व्यक्त केला. मॅनेजरमुळेच नोकर सोडत असल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com