लग्नानंतर EPF खात्यातील नॉमिनीची माहिती तपासून ई-नॉमिनेशन अपडेट करणे महत्त्वाचे
नॉमिनी अपडेट नसल्यास क्लेम प्रक्रियेत अडथळे येतात
EPFO ची ई-नॉमिनेशन सुविधा वापरून नॉमिनीची माहिती ऑनलाइन अपडेट करता येते
लग्नानंतरच्या आर्थिक नियोजनातील महत्त्वाचे काम
लग्नानंतर आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल होतात. नव्या जबाबदाऱ्या वाढतात, कुटुंबाची आर्थिक गरज बदलते आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजनही नव्याने करावे लागते. अशावेळी नोकरी करणाऱ्या पती पत्नींनी विशेतः महिलांनी आपल्या प्रोव्हिडंट फंड म्हणजेच EPF खात्याचा नॉमिनेशन अपडेट करणे महत्त्वाचे आहे. कारण असे न केल्यास पुढील अडचणी वाढू शकतात. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.
अनेक जण लग्न झाल्यानंतरही त्यांच्या EPF खात्यातील जुना नॉमिनी तसाच ठेवतात. मात्र, EPFO च्या नियमांनुसार लग्नानंतर आधी केलेले नॉमिनेशन वैध राहत नाही. त्यामुळे लग्नानंतर सदस्याने नव्याने ई-नॉमिनेशन करणे आवश्यक आहे.
EPF नॉमिनेशन हे सदस्याच्या कुटुंबाच्या स्थितीशी संबंधित असते. लग्नाआधी एखादी व्यक्ती आपल्या पालकांसह इतर पात्र कुटुंबीयांना नॉमिनी करू शकते. मात्र, लग्नानंतर कुटुंबाची कुटुंब पूर्णपणे बदलत. त्यामुळे ईपीएफ कर्मचारी पती किंवा पत्नी तसेच इतर पात्र कुटुंबीयांना नॉमिनी करू शकतो. त्यामुळे लग्नाआधी केलेले नॉमिनेशन पुढे वैध मानले जात नाही. नॉमिनेशन अपडेट केले नाही म्हणून EPF खात्यातील पैसे कुटुंबाला ते मिळत नाहीत, असे नाही. मात्र, सदस्याचा मृत्यू झाल्यास EPF ची रक्कम क्लेम करताना अडचणी वाढू शकतात. वैध नॉमिनी नोंदणीकृत नसल्यास कुटुंबीयांकडून कायदेशीर वारसाचा पुरावा किंवा इतर आवश्यक कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. त्यामुळे क्लेमची प्रक्रिया अधिक वेळखाऊ होऊ शकते.
EPFO ने नॉमिनेशन अपडेट करण्यासाठी ऑनलाइन ई-नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे सदस्य घरबसल्या नॉमिनीची माहिती अपडेट करू शकतो. आधारशी संबंधित माहितीद्वारे नाव, जन्मतारीख आणि लिंग यांसारख्या तपशीलांची पडताळणी केली जाते. यापूर्वी नॉमिनेशनसाठी Form 2 वापरला जात होता. मात्र, ई-नॉमिनेशनची सुविधा लागू असलेल्या ठिकाणी ऑनलाइन नॉमिनेशनला महत्त्व आहे.
लग्नानंतर ई-नॉमिनेशन करताना कुटुंबातील पात्र सदस्यांची माहिती अचूकपणे भरणे महत्त्वाचे आहे. नाव, जन्मतारीख आणि इतर तपशीलांमध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्या. थोडक्यात, लग्नानंतरच्या महत्त्वाच्या कामांच्या यादीत EPF नॉमिनेशन अपडेट करणे नक्कीच समाविष्ट करा. हे काम वेळेत केल्यास भविष्यात कुटुंबाला EPF ची रक्कम क्लेम करताना अनावश्यक अडचणी टाळता येऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.