दिवाळीआधी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळणार; किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता; EPFO मोठा निर्णय घेणार

EPFO Decision of Pension Limit Increases: ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीआधी खाजरी कर्मचाख्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
EPFO News
EPFO NewsSaam Tv
Published On
Summary

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारी

किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ लवकरच कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी देऊ शकते. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये दिली जाणारी किमान पेन्शन वाढवली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

EPFO News
PF Balance Check: मिस्ड कॉल द्या अन् पीएफ बॅलेन्स चेक करा; सिंपल प्रोसेस करा फॉलो

१० आणि ११ ऑक्टोबर रोजी ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक आहे.बंगळुरु येथे ही बैठक होत आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपासून ते पीएफ एटीएममधून काढण्याच्या सुविधेपर्यंत निर्णय घेतले जातील. दरम्यान, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, सध्या एम्प्लॉयी पेन्शन स्कीमअंतर्गत मिळणारी पेन्शन खूप कमी आहे. २०१४ मध्ये पेन्शन स्कीमअंतर्गत किमान पेन्शन १००० रुपये निश्चित करण्यात आली होती. या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. दरम्यान, या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, खाजगी कर्मचाऱ्यांची पेन्शन १००० रुपयांवरुन २५०० केली जाऊ शकते.

कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे. महागाई वाढत आहे त्यामुळे किमान पेन्शन खूप कमी आहे. यामुळे अनेक युनियनने पेन्शन ७५०० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र, यासाठी नकार दिला आहे.

EPFO News
EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

पेन्शन कशी मोजली जाते? (How to Calculate Pension)

कर्मचाऱ्यांची पेन्शन मोजण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पेन्शन = पेन्शनलेबल सॅलरी × सर्व्हिस)÷ 70 असा फॉर्म्युला आहे. यानुसार तुमच्या शेवटच्या ६० महिन्यांची अॅव्हरेज सॅलरी आणि सर्व्हिसचं कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यानंतर ईपीएसमध्ये पैसे जना केले जातात.

EPFO News
EPFO News : निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात! किमान पेन्शन २५०० रुपयांनी वाढण्याची शक्यता, कुणाला मिळणार फायदा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com