EPFO Balance: पगारातून PF चे पैसे कापले जातायेत, पण खात्यात जमा होतायेत का?; असं करा चेक

EPFO Balance: कर्मचाऱ्यांकडून दरमहिन्याला पीएफचे पैसे कापले जातात. हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात की नाही हे तुम्ही तपासू शकतात. ईपीएफओ खात्यात पैसे जमा होतायत की नाही हे तुम्ही या मार्गाने तपासू शकतात.
How To Check EPF Balance
How To Check EPF BalanceSaam Tv
Published On

EPFO Interest Rate Increases Know How To Check:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ने लाखो सदस्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यावरील व्याज आता वाढणार आहे. EPFO व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आले. EPFO ने २०२३-२४ साठी PF व्याज दर ८.२५ टक्के केला आहे. गेल्या तीन वर्षातील हा सर्वात जास्त व्याजदर आहे. २०२३-२४ साठी EPF वरील हे नवीन व्याजदर सहा कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात केला जाणार आहे.

EPF खात्यातून पैसे कापले जातात. त्यावर तुम्हाला वार्षिक व्याज मिळते. सरकार वर्षातून या योजनेतील दर ठरवतात. त्यानंतर EPF खात्यात जमा केलेल्या निधीवरील व्याज मोजले जाते आणि जमा केले जाते. (Latest News)

EPF खात्यावरील व्याज हे मासिक आधारावर मोजले जाते. हे पैसे वर्षातून एकदा तुमच्या खात्यावर जमा केले जातात. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ग्राहकांना लवकरच हे पैसे मिळतील, असे EPFO ने सांगितले आहे. साधारणत आर्थिक वर्षाच्या शेवटी हे व्याज ग्राहकांच्या खात्यावर जमा केले जाते. त्यामुळे मार्च- एप्रिलमध्ये त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल.

ईपीएफ शिल्लक रक्कम कशी चेक करायची?

तुमच्या ईपीएफ खात्यात व्याजाचे पैसे किती आहेत हे तपासण्यासाठी तुम्ही ईपीएफओने जारी केलेले पासबुक तपासू शकतात. त्यासाठी तुम्ही ईपीएफओ पोर्टल, फोन कॉल, उमंग अॅप किंवा एमएमएसद्वारे तपासू शकता.

How To Check EPF Balance
Income Tax: इन्कम टॅक्स वाचवायचा आहे? 'या' टिप्स फॉलो करा

EPFO पोर्टलवर पासबुक कसे तपासायचे?

सर्वप्रथम https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या वेबसाइटवर जा. त्यानंतर UAN नंबर टाका. त्यानंतर Our Services या टॅबवर जा. त्यानंतर for employees ला सिलेक्ट करा. यानंतर member passbook वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर तुमचा EPF Balance तुम्हाला दिसेल.

मिस्ड कॉल देऊन EPF पासबुक चेक करु शकता.

तुम्ही 011- 22901406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमचा ईपीएफ बँलेंस चेक करु शकता. कॉल केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यावर तुमचा बँलेस दिसेल.

उमंग अॅप

ग्राहक UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) अॅपवर जाऊन बॅलेंस चेक करु शकता. हा अॅप इन्स्टॉल करुन रजिस्चर मोबाईल नंबर टाका. त्यानंतर EPFO ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर view passbook वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पासबुकचे डीटेल्स मिळतील.

How To Check EPF Balance
Gold Silver Rate (15th February 2024): सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com