UPI मधून पीएफचे पैसे काढायचेत? आत्ताच करा EPFO ची ५ कामं, अन्यथा सेवांचा घेता येणार नाही लाभ

PF UPI Withdrawal : तुमचाही पीएफ जमा होत असेल तर ही महत्वाची माहिती जाणून घ्या. तुम्हाला आता पीएफ युपीआयच्या मदतीने काढता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
EPFO UPI PF withdrawal
UAN activation mandatorygoogle
Published On

प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या भविष्यासाठी त्याच्या पगारातला काही भाग शिल्लक ठेवत असतो. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे थेट युपीआयच्या मदतीने पीएफ काढता येईल अशी सोय करून देणार आहे. याने कर्मचाऱ्यांना पीएफसाठी बॅंकेत सतत फेऱ्या घालाव्या लागणार नाहीत. ही प्रोसेस सोप्या पद्धतीने पूर्ण होईल. पण तुम्ही जर पुढील ५ गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.

तुम्हीही तुमच्या पगारातला काही भाग भविष्यात पेन्शन म्हणून वापरणार असाल तर पुढील गोष्टींकडे लक्ष द्या. त्याने तुम्हाला व्यवहार करणं सोपं होईल.

EPFO UPI PF withdrawal
LPG Rules 2026 Update : LPG नियमात पुन्हा बदल, पाईप गॅस कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच

EPFO ने ५ लाख रुपयांपर्यंतच्या पात्र दाव्यांसाठी ऑटो-सेटलमेंटसारखी प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे आता पीएफ काढणं जास्त सोपं आणि जलद झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या नोंदीमध्ये काही चूका आल्या तर या नविन सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. बऱ्याचदा पीएफ काढण्यासाठी होणारा उशीर हा नियमांमुळे नाही, तर बॅंकेचं खातं, मोबाईल नंबर किंवा नोकरीच्या नोंदींमध्ये चुका असल्यास होऊ शकतो. म्हणूनच पुढील ५ गोष्टींकडे लक्ष द्या.

1. UNA अॅक्टीव्ह असणं सर्वात महत्वाचं

तुम्हाला ईपीएफओ 3.o प्रणाली अंतर्गत UPIचा वापर करून पीएफ काढायचा असेल तर तुमचा UNA अॅक्टीव्ह करावा लागेल. नाहीतर तुम्हाला KYC, PF विथड्रॉल आणि डिजिटल सेवांचा वापरता येणार नाहीत. पासवर्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर योग्य असल्याची खात्री करा.

2. आधार नंबर आणि PAN नंबर तपासा

EPFO रेकॉर्डमधलं तुमचं नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती आधार कार्डाशी जुळणारी असली पाहिजे. PAN आणि आधार UAN शी लिंक आणि व्हेरिफाय असेल तरच तुम्हाला ऑनलाइन पीएफ काढता येईल. नाहीतर जेव्हा तुम्ही PF काढता तेव्हा तुमचा जास्त TDS कापला जातो.

3. बँक खातं आणि UPIची माहिती अपडेट ठेवा

EPFO पोर्टलचं बँक खातं क्रमांक, IFSC कोड आणि खातेदाराचे नाव हे चुकलेलं नसलं पाहिजे. चुकीची किंवा बंद झालेल्या खात्याची माहिती तिथे असेल तर पैसे अडकू शकतात. त्यामुळे त्याच्याशी योग्य खातं लिंक करा.

4. मोबाईल नंबर सक्रिय ठेवा

UPI व्यवहारांसाठी OTP हा खूप महत्वाचा असतो. आधार, UAN आणि UPI शी जोडलेला मोबाईल नंबर सुरू ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर सर्व ठिकाणी एकच मोबाईल नंबर वापरण्याचा प्रयत्न करा.

EPFO UPI PF withdrawal
Bank Holiday : आज की उद्या? बकरी ईद निमित्त बँका कधी बंद राहणार? 'ही' तारीख वाचूनच घराबाहेर पडा

5. नोकरीचा रेकॉर्ड आणि नॉमिनी अपडेट करा

EPF खात्यातली नोकरीची माहिती आणि जुनी PF खाती बरोबर अपडेट आहे का ते तपासून घ्या. e-Nomination माहिती तिखे नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबात काही बदल झाला असेल तर नॉमिनीची माहिती लगेचच अपडेट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com