
तुम्ही भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजेच ईपीएफओचे सदस्य आहात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने या सदस्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. ईपीएफ क्लेम सेटलमेंटवरील व्याजासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल लागू झाला तर, व्याजही वाढेल आणि दावे प्रचंड वेगाने निकाली निघतील.
ईपीएफओने सदस्यांसाठी ईपीएफ क्लेम सेटलमेंटवरील व्याजाचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. याचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
३० नोव्हेंबर २०२४ रोजी केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) आपल्या निर्णयात इपीएफओच्या कलम ६० (२) (बी) मधील नियम बदलले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सभासदांना अधिक व्याज मिळेल आणि सेटलमेंट जलद होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात देण्यात आली आहे. मात्र, अद्याप हा नवीन नियम लागू करण्यात आला नसून, सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर हा नवा नियम लागू होईल.
ईपीएफओने केलेल्या घोषणेनुसार, केंद्रीय विश्वस्त मंडळाने इपीएफ स्कीम १९५२ च्या ६० (२) (बी) मध्ये महत्त्वाच्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. सध्याच्या नियमांनुसार, महिन्याच्या २४ तारखेपर्यंत सेटलमेंटवरील व्याज मागील महिन्याच्या शेवटपर्यंत दिले जाईल. तर ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल आणि अधिकचं व्याज त्यांना मिळेल, तसेच प्रलंबित दाव्यांचा निपटाराही वेगाने होऊ शकेल.
सध्या २५ तारखेपासून महिनाअखेरपर्यंत सेटलमेंट केले जात नव्हते. मात्र आता संपूर्ण महिनाभर सेटलमेंट करता येणार आहे. या निर्णयावरून संस्था किती कार्यक्षम, पारदर्शक आणि सदस्यांच्या कल्याणाचा विचार करणारी आहे हे दिसून येते, असे ईपीएफओने म्हटलं आहे.
उदाहरणार्थ, इपीएफ सदस्याची एकूण शिल्लक रक्कम ५ लाख रूपये आहे. सध्या ८.२५ टक्के व्याजदर आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने महिनाअखेरीस सेटलमेंट केले तर, हा नियम लागू झाल्यानंतर २३ दिवसांचे व्याज देखील मिळेल. आतापर्यंत सेटलमेंटच्या एका महिन्यापर्यंतच व्याज मिळत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.