अनिल अंबानी अडचणीत; इडीच्या छापेमारीनंतर आता लूकआऊट नोटीस, देश सोडून जाता येणार नाही

ED Issues Lookout Circular Against Anil Ambani : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने १७००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात त्यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यांना भारताबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी, ईडीने त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर काही दिवसांपूर्वी छापे मारले होते.
अनिल अंबानींवर ईडी कारवाईचा फास, लूकआऊट नोटीस जारी, देशाबाहेर जाण्यास मनाई
Anil Ambani ED lookout noticesaam tv
Published On
Summary
  • ईडीची अनिल अंबानींविरोधात लूकआऊट नोटीस

  • अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या

  • अनिल अंबानींना एकप्रकारे देशाबाहेर जाण्यास मनाई

  • काही दिवसांपूर्वीच ईडीने मुंबईत विविध ठिकाणांवर मारले होते छापे

ED Tightens Grip on Anil Ambani with Lookout Notice in Loan Scam : अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (ADG) चे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात ईडीने लूकआऊट सर्क्युलर जारी केलं आहे. एका अर्थाने त्यांना भारताबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ईडीने १७००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. मुंबई आणि अन्य शहरांमध्ये एडीजीच्या कंपन्यांशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणांवर छापे मारल्यानंतर ईडीने आता ही कारवाई केली आहे.

अनिल अंबानी यांची ईडीने पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. ईडीने त्यांना ५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या मुख्यालयात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून १७००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूक प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. मागील आठवड्यातच अनिल अंबानींच्या कंपनीशी संबंधित अनेक कंपन्या आणि व्यक्तींशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले होते. मुंबईतील ३५ हून अधिक ठिकाणांची झाडाझडती घेतली होती. त्यात ५० कंपन्या आणि जवळपास २५ व्यक्तींचा समावेश होता.

अनिल अंबानी यांनी कर्जस्वरूपात घेतलेला रकमेचा गैरवापर केल्याचा संशय ईडीला आहे. तपास यंत्रणेने या प्रकरणात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. अंबानींना या प्रकरणात चौकशीलाही बोलावलं आहे. १७००० कोटी रुपयांचे कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात लूकआऊट सर्कुलर जारी करणं आणि त्यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करणं यावरून तपास यंत्रणेनं हे प्रकरण किती गंभीरपणे घेतलं आहे, हेच यावरून दिसून येतं.

अनिल अंबानींवर ईडी कारवाईचा फास, लूकआऊट नोटीस जारी, देशाबाहेर जाण्यास मनाई
Anil Ambani: मोठी बातमी! अनिल अंबानींना मोठा झटका! २५ कोटींचा दंड अन् ५ वर्षांसाठी सेबीने घातली बंदी

अनिल अंबानी समूहातील अनेक कंपन्यांद्वारे झालेली आर्थिक अनियमितता आणि १० हजार कोटींहून अधिकचे लोन डायव्हर्जन याभोवती ईडीचा तपास केंद्रीत आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत येस बँकेद्वारे दिलेल्या जवळपास ३००० कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या दुसऱ्याच ठिकाणी वळवण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. त्यावर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने स्टॉक इक्स्चेंजला कळवलं की, त्यांना ईडीने केलेल्या कारवाईबद्दल कल्पना आहे. मात्र, या छापेमारीचा त्यांच्या बिझनेस, आर्थइक स्थिती आणि स्टेकहोल्डर्सवर काहीही परिणाम झाला नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये ज्या देवाण-घेवाणीबद्दल चर्चा होत आहे, ती रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडशी संबंधित आहे, असेही या कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

अनिल अंबानींवर ईडी कारवाईचा फास, लूकआऊट नोटीस जारी, देशाबाहेर जाण्यास मनाई
Anil Ambani: अनिल अंबानीची एकूण संपत्ती किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com