ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनिल अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे पुत्र आहेत. २००६ मध्ये समूहाच्या बहुचर्चित विलगीकरणानंतर, अनिल अंबानींना रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) , रिलायन्स कॅपिटल , रिलायन्स एनर्जी आणि रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस सारख्या कंपन्या मिळाल्या.
कथित ३००० कोटींच्या मनी लॉंड्रिंग गुन्ह्याशी संबधित ईडीने अनिल अंबानींशी संबधित ३५ ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली आहे.
कथित येस बॅंकेच्या कर्जाशी संबधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही छापेमारी सुरु आहे. सध्या पीएमएलए कलम १७ अंतर्गत अनिल अंबानीशी संबधित ५० हून अधिक कंपन्यावर आणि २५ हून अधिक व्यक्तींच्या परिसरात ईडीने छापे मारले आहेत.
२००८ मध्ये, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ४२ अब्ज डॉलर्स होती. त्यावेळी ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तसेच त्यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत होते.
वृत्तानुसार, १० मार्च २०२५ पर्यंत अनिल अंबानींची एकूण संपत्ती $५३० दशलक्ष इतकी आहे.
काही अहवालानुसार, अनिल अंबानींची एकूण संपत्ती प्रत्यक्षात $५३० दशलक्षपेक्षा जास्त असू शकते, म्हणजेच ती $३ अब्जच्या जवळपास असण्याचा अंदाज आहे.
२०२० मध्ये, युकेच्या न्यायलयात अनिल अंबानी यांनी आपल्याकडे कोणताही आर्थिक मालमत्ता नसल्याचा दावा केला. तसेच त्यांना कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे म्हटले होते.