ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा रक्तदाब सामान्यपेक्षा जास्त होतो तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयावर जास्त दाब पडतो, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
उच्च रक्तदाबामुळे शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. याची तीन मुख्य लक्षणे कोणती, जाणून घ्या.
बदलती जीवनशैली, अनहेल्दी खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि लठ्ठपणा यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.
जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा मेंदूच्या नसांवर दबाव वाढतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. तसेच अशावेळी घाबरणे किंवा घाम सुटणे असे त्रास जाणवू शकतात.
उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या अनेक भागात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात समस्या येते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा थकवा जाणवू शकतो.
फळे आणि भाज्या खा. तळलेले आणि जास्त मीठ असलेले पदार्थ कमी खा. याशिवाय, दररोज किमान 30 मिनिटे चाला, योगा किंवा व्यायाम करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा, आणि पुरेशी झोप घ्या.