E Shram Card: या नागरिकांना दर महिन्याला मिळतात ३००० रुपये; ई-श्रम योजना नक्की आहे तरी काय?

E Shram Scheme: केंद्र सरकारने नागरिकांना ई-श्रम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ३००० रुपये मिळतात.
E-Shram Card
E-Shram CardSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. त्याचसोबत अनेक सोयी-सुविधा मिळतात. अशीच एक योजना म्हणजे ई- श्रम योजना. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शनचे पैसे मिळते. परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे या लोकांच्या भविष्यासाठी ई-श्रम योजना राबवण्यात आली आहे. (E-Shram Card)

E-Shram Card
Post office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल

ई-श्रम योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला पेन्शन स्वरुपात ठरावीक रक्कम दिली जाते. यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित राहते. या योजनेअंतर्गत नागरिकांना वयाच्या ६० वर्षानंतर पैसे दिले जातात.

ई-श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या लोकांना ही मदत मिळते. या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम कार्ड बनवले जातात. (E-Shram Scheme)

या योजनेअंतर्गत जर एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला २ लाख रुपये मिळतात. अंपगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लाभ घेतला आहे.

E-Shram Card
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा अन् महिन्याला ९२५० मिळवा; जाणून घ्या सविस्तर

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई-श्रम पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रशन करावे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकावा. यानंतर फॉर्म सबमिट करावा. या योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

E-Shram Card
Government Scheme: लाडकी बहीण योजनेसारखेच 'या' योजनांचे पैसेही थेट बँक खात्यात जमा होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com