UPI च्या माध्यमातून व्यवहार करण्यास सर्वाधिक पसंती दिली जातेय. परंतु काही कामांसाठी जे डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम लागते. अशा परिस्थितीत अनेकदा लोकांना रोख रकमेअभावी समस्यांना सामोरे जावे लागते. हात खर्चसाठी काहीजण रोख पैसे ठेवत असतात. आधीसारखं अनेकजण बँकेत स्लीप भरून पैसे न काढता एटीएममधून पैसे काढत असतात. (Latest News)
पण एटीएम कार्ड नसल्यास अडचणी येत असतात. कारण बँकेत जाऊन स्लीप भरून पैसे काढण्यसाठी तासन् तास रांगेत उभे राहवे लागते. बऱ्याचदा स्लीप भरण्यासाठी अनेकांकडे बॉल पेन नसतो. यामुळे एटीएमने पैसे काढण्याच्या पर्यायाकडे अनेकांचा कल असतो. परंत एटीएमच नसेल तर. कधी-कधी एटीएम राहूनही पैसे निघत नाहीत. ही समस्या संपवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले YONO अॅप UPI शी लिंक केलय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
योनो अॅपच्या माध्यमातून आता क्रेडिट कार्डशिवायही एटीएममधून सहज पैसे काढता येणार आहेत. या फीचरला इंटर पेएबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल असं म्हटलं जातं. ही सुविधा सर्व एटीएमवर उपलब्ध आहे. या नवीन फीचरमुळे एटीएम कार्डच्या क्लोनिंगमुळे होणारी फसवणूक रोखता येणं शक्य होणार आहे.
डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे?
तुमच्या फोनमध्ये योनो अॅप ओपन करा.
‘कॅश विथड्रॉवल’ पर्याय निवडा.
किती रोख रक्कम काढायची आहे ते भरा.
यानंतर एटीएम निवडा.
आता एक QR कोड जनरेट होईल.
तुम्हाला QR कोड स्कॅन करावा लागेल.
QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा UPI आयडी आणि UPI पिन टाकावा लागेल.
UPI पिन टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.