ChatGPT वर आता ग्रुप चॅट करता येणार; Open AI चा नवा फंडा; कसं वापरायचं?

ChatGPT Group Chat: देशातील लाखो लोक ChatGPT चा वापर करतात. आता तुम्हाला चॅटजीपीटीवरुन ग्रुप चॅट करता येणार आहे. हे नवीन फीचर कसं वापरायचं ते जाणून घ्या.
ChatGPT
ChatGPTSaam Tv
Published On

सध्या सर्वजण एआयचा वापर करतात. एआयमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत.सध्या चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता चॅटजीपीटीने एक नवीन फीचर लाँच केले आहे. आता तुम्हाला ग्रुप चॅट करता येणार आहे. याआधी ही ग्रुप चॅट काही लोकांसाठीच सुरु केले होते. त्यानंतर आता OpenAI ने हे सर्वांसाठी सुरु केले आहे. ChatGPT ग्रुप चॅट फीचर सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही मोफतदेखील हे फीचर वापरु शकतात.

ChatGPT
EPFO News: EPFO च्या PF खात्यावर मिळतो 7 लाख रुपयांचा विमा कव्हर; जाणून घ्या कसा फायदा मिळतो?

ChatGPT मधील ग्रुप चॅटमुळे अनेक कामे सोपी होणार आहेत. ग्रुप चॅटमुळे युजर्संना प्रोजेक्टची योजना आखण्यासाठी आणि एकत्रितपणे काम करण्याची परवानगी देतात. एकाच वेळी अनेकजण चॅटजीपीटीवरुन संवाद साधू शकतात. एआयला आपल्या सूचना देऊ शकतात. यामुळे चॅटजीपीटी या सूचनांवर काम करुन योग्य ती माहिती देते. हे ग्रुप चॅट पर्सनल संभाषणापेत्रा वेगळे असते.

सर्व देशात उपलब्ध नाही

ChatGPT चं हे ग्रुप चॅट सध्या सर्व देशांमध्ये लाँच झालेले नाही. जागतिक स्तरावर लाँच झाले असले तरीही सर्व देशांमध्ये सुरु होण्यासाठी वेळ लागू शकतो. सध्या ChatGPT ग्रुप चॅट हे जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि तैवान येथे उपलब्ध आहे. OpenAI ने याबाबत सांगितले की, अधिकाधिक लोक हे ग्रुप चॅट वापरण्यास सुरुवात करतील. हा पायलट प्रोजेक्टमधील सामायिक अनुभवांच्या दिशेने पहिला टप्पा आहे.

ChatGPT
ChatGPT : चुकूनही Chatgpt ला या पाच गोष्टी कधीच विचारु नका

ChatGPT ग्रुप चॅट कसं वापरायचं? (ChatGPT Use)

सर्वात आधी तुमचे चॅटजीपीटी अपडेट असणे गरजेचे आहे. अपडेट केल्यानंतर लॉग इन करा. यानंतर चॅट ऑप्शन निवडा. तिथे तुम्हाला उजव्या कोपऱ्यात नवीन लोक असा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करा.

जेव्हा तुम्ही पहिला ग्रुप तयार करता तेव्हा चॅटजीपीटी तुम्हाला युजर्स, युजर्सचे नाव, फोटो याबाबत माहिती विचारले. यानंतर तुमचे सर्व ग्रुप चॅट नंतर साइडबारमधील विभागात दिसेल.

ChatGPT
Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com