बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लान आणलाय. बीएसएनएलने प्रीपेड सीम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लान लॉन्च केलाय. या प्लानची वैधता ही ३५दिवसांची असणार आहे. या प्लानसाठी खर्च मात्र नाममात्र आहे. या ३५ दिवसांच्या वैधतेसह व्हाईस कॉलिंग आणि डेटाचा लाभ देखील घेता येणार आहे. Jio आणि Airtel च्या ३० किंवा ३५ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी वापरकर्त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. (Latest News)
BSNL चा १०७ रिचार्ज प्लॅन
बीएसएनएलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन १०७ रुपयांचा आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३५ दिवसांची पूर्ण वैधता मिळते. हा प्लॅन त्या वापरकर्त्यांसाठी आहे जे BSNL सिम दुय्यम क्रमांक म्हणून वापरतात. यामध्ये युजर्सना एकूण 3GB डेटाचा फायदा मिळणार आहे. तसेच, यात अमर्यादित इनकमिंग कॉल्स तसेच २०० मिनिटांच्या आउटगोइंग कॉलचा फायदा मिळणार आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सरकारी टेलिकॉम कंपनीने अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये आपली ४G सेवा सुरू केलीय. लवकरच कंपनी देशभरात ४G लाँच करणार आहे. या प्लानमध्ये यूजर्सना ३GB हाय स्पीड डेटा मिळेल, त्याची मुदत संपल्यानंतरही यूजर्सना ४०kbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेटचा लाभ मिळत राहील. त्याचवेळी, इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलचा लाभ वापरकर्त्याच्या सिममध्ये ३५ दिवसांसाठी मिळतो.
जिओ, एअरटेल रिचार्ज प्लान
Jio आणि Airtel च्या ३० दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी वापरकर्त्यांना २९६ रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंगसह २५ जीबी डेटाचा लाभ मिळतो. एअरटेलचा ३५ दिवसांचा रिचार्ज प्लॅन २८९ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण ४GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.