
वन प्लस ही स्मार्टफोन उत्पादनातील नावाजलेली कंपनी आहे. कंपनीचे नवनवीन स्मार्टफोन बाजारात लाँच होत असतात. कंपनीने नुकतीच One Plus 12 सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे.
OnePlus 12 आणि OnePlus 12R चा पहिला सेल दुपारी १२ वाजल्यापासून भारतात सुरु झाला आहे. या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे.
OnePlus 12R स्मार्टफोन Amazon India आणि One Plus India या वेबसाइटवर उपलब्ध आहे. Amazon India ने या हँडसेटवर ऑफर दिली आहे. त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Latest News)
OnePlus 12R
OnePlus 12R वर ICICI बँक आणि OneCard द्वारे १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच या स्मार्टफोनवर OnePlus Buds Z2 मोफत मिळणार आहेत. OnePlus 12R फोनची विक्री सुरु झाल्यनंतर १२ तासांत स्मार्टफोन खरेदी केल्यावर या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
OnePlus 12R स्पेसिफिकेशन
OnePlus 12R मध्ये LTPO4.0 डिस्प्लेसह 6.78 इंच AMOLED ProXDR डिस्प्ले वापरण्यात आला आहे. यात 120 Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट असेल. स्क्रिनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्ट्स 2 वापरण्यात आला आहे.
OnePlus 12R मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट वापरण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Adreno 740 GPU वापरण्यात आला आहे. हा फोन 8GB/16GB LPDDR5X रॅम आणि 128GB स्टोरेजसह बाजारात उपलब्ध आहे. हा फोन Android 14 वर आधारित OxygenOs14 वर काम करतो.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. जो Sony IMX890 सेन्सरसह येतो. यात 112 डिग्री फिल्ड व्हूयसह 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यात 2MP चा तिसरा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरासाठी 16MP कॅमेरा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.