VIP Number: VIP नंबरसाठी किती पैसे द्यावे लागतात? १ ते ९९९९ नंबरपर्यंत सर्वांचे शुल्क घ्या जाणून

VIP Registration Number Fees: सर्वांना आपल्या कारसाठी व्हिआयपी नंबर हवा असतो. व्हिआयपी नंबरसाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतात. कोणत्या नंबरसाठी किती पैसे मोजावे लागणार ते जाणून घ्या.
VIP Number
VIP NumberSaam Tv
Published On

प्रत्येकाचे स्वतः ची कार घेण्याचे स्वप्न असते. स्वतः ची एकतरी गाडी असावी, यासाठी खूप आधीपासून पैसे जमा करतात. स्वतः ची कार घेण्याचे स्वप्न पाहताना त्या कारची नंबर प्लेट काय असणार याचाही अनेकांनी विचार केलेले असावी. काही लोकांना व्हिआयपी नंबर प्लेट असावी असे वाटत असते. व्हिआयपी नंबर प्लेट घेण्यासाठी पैसेदेखील जास्तीचे मोजावे लागतात. (VIP Number)

VIP Number
VIP Number Registration: कार, बाईकसाठी VIP नंबर मिळवायचाय? आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करा रजिस्ट्रेशन

व्हिआयपी नंबर प्लेटमध्ये १,९९, ९९९,९९९९ असे नंबर अनेकांना हवे असतात. परंतु या व्हिआयपी नंबरसाठी शुल्कदेखील जास्त द्यावे लागते. तुम्हाला व्हिआयपी नंबरसाठी किती शुल्क भरावे लागू शकते, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

बाईक आणि कारसाठीदेखील तुम्ही व्हिआयपी नंबर प्लेट घेऊ शकतात. तुम्हाला जर तुमच्या कार किंवा बाईकसाठी १ नंबर हवा असेल तर १ लाख ते ६ लाख रुपये द्यावे लागतात. दोन चाकी वाहनांना १ लाख रुपये तर चार चाकी वाहनांना ६ लाख रुपये द्यावे लागतात. (VIP Number Registration Fees)

जर तुम्हाला ९,९९,७८६,९९९,९९९९ हा नंबर हवा असेल तर ५०,००० ते २.५ लाख रुपये मोजावे लागणार आहे. बाईकसाठी ५०,००० तर कारच्या नंबरसाठी २.५ लाख रुपये भरावे लागणार आहेत.

जर तुम्हाला १११,२२२,३३३,४४४,५५५,६६६,७७७,८८८,११११,२२२२,३३३३,४४४४,५५५५,६६६६,७७७७,८८८८ यापैकी कोणताही नंबर हवा असेल तर २५,००० ते १ लाख रुपये द्यावे लागणार आहे.बाईकसाठी २५००० रुपये द्यावे लागणार आहे. तर कारसाठी १ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

VIP Number
Government Scheme: महिलांची 'ही' खास योजना बंद होणार, सरकारचा निर्णय, गुंतवणुकीसाठी उरले फक्त १२० दिवस!

आता कारच्या नंबरसाठी रजिस्ट्रेशन करणे हे सोपे झाले आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करु शकतात. परिवहन या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुम्ही माहिती सर्वप्रथम भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्या नंबरसाठी किती शुल्क असणार आहे ते भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला नंबर देण्यात येईल.

VIP Number
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com