Flipkart Big Saving Days Sale च्या आधीच iPhone 14, iPhone 12 वर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Apple Iphone 14 Iphone, 12 Get Discount: जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ते. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू होण्याआधीच आयफोन 14 आणि आयफोन 12 मोठी सूट मिळत आहे.
 Iphone 14
Iphone 14Saam Tv

Apple Iphone 14 Iphone, 12 Get Discount:

जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ते. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू होण्याआधीच आयफोन 14 आणि आयफोन 12 मोठी सूट मिळत आहे.

यातच Flipkart काही निवडक बँक कार्ड आणि EMI वर सूट देत आहे. याव्यतिरिक्त ग्राहक आयफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेऊ शकतात. चाल तर जाणून घेऊ आयफोन 14 आणि आयफोन 12 वर काय मिळत आहे ऑफर...

 Iphone 14
स्पोर्टी लूक अन् जबरदस्त फीचरसह Mahindra XUV 3XO लाँच; किंमत दहा लाखांपेक्षा कमी

काय आहे ऑफर?

iPhone 14 च्या 128GB स्टोरेजसह ब्लू कलर व्हेरिएंटची किंमत 69,990 रुपये आहे. मात्र हा फोन फक्त 54,999 रुपयांच्या कमी किंमतीसह फ्लिपकार्टवर लिस्ट झाला आहे. तर याच्या 256GB व्हेरिएंटची किंमत 68,999 रुपये आणि 512GB व्हेरिएंटची किंमत वेबसाइटवर 88,999 रुपये लिस्ट करण्यात आली आहे.

मात्र जर ग्राहकांनी सिटी ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणि ईएमआयद्वारे हे फोन खरेदी केले तर त्यांना 1,500 रुपयांची सूट दिली मिळू शकते. यासोबतच, ई-कॉमर्स वेबसाइट वनकार्ड क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 750 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर 47,100 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

 Iphone 14
3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

iPhone 12 वर किती मिळत आहे सूट?

iPhone 12 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचं झाला तर, या फोनचा 64GB व्हेरिएंटची किंमत 65,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा फोन फक्त 40,999 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे.

तसेच याचा128GB व्हेरिएंट 50,999 रुपयांना आणि 256GB व्हेरिएंट 63,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. जर तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर त्याची किंमत 38,600 रुपयांनी कमी होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com