Net Worth: अंबानी-अदानींचा मोठा झटका; 100 अरब डॉलरच्या लिस्टमधून बाहेर

Ambani Adani Net Worth: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता 100 अब्ज डॉलरच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती जुलै 2024 मध्ये $120.8 अब्ज असल्याची माहिती होती.
Ambani Adani Industrialists dropped out
Ambani Adani Industrialists dropped outsaam tv
Published On

भारतात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नावाची चर्चा होते. मात्र या दोन्ही उद्योगपतींना मोठा झटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता 100 अब्ज डॉलरच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत. अलिकडच्या काळात काही महिन्यांत या दोघांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड घसरणीने त्यांना केवळ क्लबमधून बाहेर फेकलं नाहीये तर त्यांच्या व्यावसायिक साम्राज्यापुढे नवीन आव्हानंही निर्माण केली आहेत.

Ambani Adani Industrialists dropped out
Gold Price Today: सोन्याच्या भाव कडाडले, लग्नसराईत ग्राहकांना चिंता; पाहा १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार

मुकेश अंबानीच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण

मुकेश अंबानी यांची संपत्ती जुलै 2024 मध्ये $120.8 अब्ज असल्याची माहिती होती. जी आता डिसेंबर 2024 मध्ये जवळपास $96.7 बिलियन झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल आणि एनर्जी विभागांची कमकुवत कामगिरी आणि वाढत्या कर्जामुळे झाली असल्याचा अंदाज आहे.

Ambani Adani Industrialists dropped out
Ladki Bahin Yojana: 'या' ठिकाणी गुंतवू शकता लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे; मिळू शकतील चांगले रिटर्न

कंपनीच्या व्यवसाय विस्ताराबाबत अंबानीच्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली. याशिवाय जुलैमध्ये त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीची ही पातळी सुमारे 24 अब्ज डॉलरने कमी झाल्याची माहिती आहे.

Ambani Adani Industrialists dropped out
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी कमवा अजून पैसे, 'हा' साधा सोपा बिझनेस महिलांना करेल मालामाल

अदानींची परिस्थिती अजूनच गंभीर

गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होण्यामागे यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डीओजे) आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातंय. हिंडेनबर्ग अहवालातील फसवणुकीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या इमेजला मोठा धक्का बसला. यावेळी जून २०२४ मध्ये अदानीची संपत्ती १२२.३ अब्ज डॉलर होती, तर तिच आता नोव्हेंबर २०२४ मध्ये ८२.१ अब्ज डॉलरवर येऊन पोहोचली आहे. ही घट झाल्यामुळे अदानींना ब्लूमबर्गच्या “सेंटबिलियनेअर क्लब” मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब

वॉलमार्टचे वॉल्टन कुटुंब 432.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यानतंर या यादीमध्ये मुकेश अंबानी आठव्या स्थानावर आहेत. तर अदानी यांना या यादीतून बाहेर आहेत.

Ambani Adani Industrialists dropped out
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी कमवा अजून पैसे, 'हा' साधा सोपा बिझनेस महिलांना करेल मालामाल

ठोस पावलं उचलण्याची गरज

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेली घसरण भारतीय उद्योगासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. दोन्ही उद्योगपतींना त्यांचा बिझनेस रूळावर आणण्यासाठी काही ठोस आणि धोरणात्मक पावलं उचलावी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com