Bank Holidays in August 2023 : ऑगस्टमध्ये १४ दिवस बँका बंद, कोणकोणते दिवस? जाणून घ्या सविस्तर

Bank Holidays 2023 : जर तुमचे बँकेत काही कामे असतील तर या सुट्ट्यांच्या यादीबाबत जाणून घ्या.
Bank Holidays
Bank HolidaysSaam Tv
Published On

Bank Holidays in August 2023 List : देशभरातील बँका ऑगस्ट महिन्यात एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट २०२३ च्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जर तुमचे बँकेत काही कामे असतील तर या सुट्ट्यांच्या यादीबाबत जाणून घ्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. यात सण-उत्सव आणि इतर सुट्ट्या तसेच वीकेंडच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्व राज्यांच्या अधिकृत सुट्ट्या आहेत. तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, रविवार व्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

Bank Holidays
Places to Visit in Kargil : कारगिलमध्ये बघण्यासारखं बरंच काही... डोळ्यांत साठवून ठेवाल अशा सौंदर्यस्थळांविषयी जाणून घ्या

ऑगस्ट २०२३ मधील बँकेच्या सुट्ट्या

आजकाल बँकांची बरीच कामे आपण घरबसल्या करतो. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत बँकेच्या सुट्ट्यांची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. ऑगस्ट २०२३ मध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत, ते जाणून घेऊया.

६ ऑगस्ट : पहिला रविवार

८ ऑगस्ट: तेंडोंग ल्हो रम फाट, सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

१२ ऑगस्ट: दुसरा शनिवार

१३ ऑगस्ट: दुसरा रविवार

१५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

१६ ऑगस्ट : महाराष्ट्रात पारशी नववर्षानिमित्त बँका बंद राहणार आहेत.

१८ ऑगस्ट: श्रीमंत शंकरदेव तिथी, आसाममध्ये बँका बंद राहतील.

Bank Holidays
Samsung Galaxy Z Fold 5: जबरदस्त बॅटरीसह सॅमसंगचा फोल्डेबल फोन लॉन्च! जाणून घ्या फीचर व किमत

२० ऑगस्ट: तिसरा रविवार

२६ ऑगस्ट: चौथा शनिवार

२७ ऑगस्ट: चौथा रविवार

२८ ऑगस्ट: पहिला ओनम - केरळमध्ये बँका बंद राहतील.

२९ऑगस्ट: तिरुवोनम - केरळमध्ये बँका बंद राहतील.

३० ऑगस्ट: रक्षाबंधन- राजस्थान आणि हिमाचल प्रदेशसह देशातील काही राज्यांमध्ये 30 तारखेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. त्यामुळे बँका बंद राहतील.

३१ ऑगस्ट : रक्षाबंधन, श्री नारायण गुरु जयंती, पांग-लबसोल या सणाच्या निमित्ताने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ आणि आसामसह देशातील इतर अनेक राज्यांमध्ये रक्षाबंधनाची सुट्टी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com