Samsung Galaxy Z Fold 5: जबरदस्त बॅटरीसह सॅमसंगचा फोल्डेबल फोन लॉन्च! जाणून घ्या फीचर व किमत

Samsung Galaxy Foldable Phone Launch 2023 : सॅमसंगचा हा फोन या वर्षातील सर्वात महागड्या आणि प्रीमियम फोनपैकी एक असेल.
Samsung Galaxy Z Fold 5
Samsung Galaxy Z Fold 5Saam Tv

Samsung Galaxy Z Fold 5 Launch, Specification, Price:

मोबाईलच्या जगात सॅमसंग या ब्रॅण्डचं नाव पहिल्या स्थानी आहे. मोबाईल प्रेमींसाठी सॅमसंग ही पहिली पसंती आहे. मोबाईल प्रेमींसाठी सॅमसंग आता एक नवीन फोल्डेबल फोन बाजारात घेऊन आला आहे. हा फोन या वर्षातील सर्वात महागड्या आणि प्रीमियम फोनपैकी एक असेल.

Samsung Galaxy Unpacked 2023 इवेंट आज म्हणजेच २६ जुलैला ४.३० वाजता सुरू होणार आहे. कंपनीने यापूर्वीच नवीन Galaxy Z Flip 5 लाँच केल्याची घोषणा केली आहे. जो फोन काही मोठ्या अपग्रेडसह येण्याची शक्यता आहे. परंतु अनेकांच्या नजरा अजूनही सॅमसंगच्या वर्षभराचील सर्वात महाग आणि प्रीमियम स्मार्टफोन Galaxy Z Fold 5 वर आहेत .

Samsung Galaxy Z Fold 5
Chat GPT App Launch For Android: प्रतीक्षा संपली! चॅट जीपीटी भारतात लॉन्च; अँड्रॉइड फोनमध्ये असे कराल डाउनलोड

सॅमसंगचा हा पाचवा Galaxy Z Fold फोन असणार आहे. त्यामुळे यूजर्सच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. काही सुत्रांनुसार सांगितले आहे की, त्याच्या डिझाइनमध्ये फारसा बदल होणार नाही. त्याऐवजी, काही किरकोळ बदलांसह Galaxy Z Fold 5 मागील वर्षीच्या Galaxy Z Fold 4 सारखा असू शकतो.

१. आतापर्यंत समोर आलेली माहिती

2019 मध्ये पहिला Galaxy Fold लाँच झाल्यापासून त्यानंतरच्या फोनमध्यये बरेच बदल झाले आहेत. SmartPrix च्या रेंडरनुसार, नवीन बिजागर डिझाइनमुळे या वर्षी दोन डिस्प्लेमधील अंतर कमी केले जाईल. हे डिझाइन लहान असेल परंतु त्याचे महत्त्वपूर्ण फायदे होतील. हे गॅपलेस डिझाइन धुळीचे कण काढून टाकण्यासाठी अधिक उपयोगी ठरेल.

Samsung Galaxy Z Fold 5
Income Tax Return : टॅक्स भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! ITR-1 चा फॉर्म भरण्याचा अधिकार कुणाला? जाणून घ्या सविस्तर

शिवाय, ही फोल्डिंग मकेनिज़्म फर्मनेस वाढवू शकते. सॅमसंगला धूळ प्रतिरोधासाठी अधिकृत IP रेटिंग मिळविण्यात मदत करू शकते. जे सध्याच्या Galaxy Z Fold फोनमध्ये नाही. दरवर्षीप्रमाणे, आम्ही आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये टॉप-ऑफ-द-लाइन चिपसेटही असू शकते. या व्यतिरिक्त, हा फोन Android 13 सह येऊ शकतो. सॅमसंग काही वेळापासून गुगलसह त्याच्या डिव्हाइसेसवरील Android सिस्टम सुधारण्यासाठी काम करत आहे.

२. कॅमेरा सिस्टम

Galaxy Z Fold 5 ला Galaxy S23 Ultra सारखीच कॅमेरा सिस्टीम असू शकते.त्यामुळे त्यात 200MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो शूटरचा समावेश असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Z Fold 5 मध्ये 4MP किंवा 5MP अंतर्गत डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Samsung Galaxy Z Fold 5
Monsoon Diarrhea Problem In Kids: पावसाळ्यात मुलांचे पोट बिघडले? तर डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश लगेच करा

यूजर्स मागील कॅमेरामधून सेल्फी क्लिक करू शकतील. तसेच बाह्य डिस्प्ले सहजपणे व्ह्यूफाइंडरमध्ये रूपांतर केला जाऊ शकतो. Galaxy Z Fold 5 मध्ये कंपनी 4400mAh ऐवजी 5000mAh बॅटरी समाविष्ट असू शकते. मात्र, चार्जिंगचा वेग मागील फोनसारखा राहण्याची शक्यता आहे.

३. किमत

या फोनसाठी सॅमसंग नवीन स्ट्रॅटेजी वापरू शकतो. मागील वर्षी कंपनीने Galaxy Z Fold 4 ची किमत १,४९,९९९ रुपयांपासून ते १,५४,९९९ एवढी केली होती. त्यामुळे या वर्षीच्या फोनमध्ये किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये सॅमसंग कंपनी नवीन हार्डवेअरचा वापर करु शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com