
फेब्रुवारी महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. फेब्रुवारी महिन्यात अनेकांना बँकेत कामे असतील. फेब्रुवारी महिन्यात बजेटदेखील जाहीर होणार आहे. त्यामुळे शेअर मार्केटवर मोठा परिणाम होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की चेक करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात १४ दिवस बँका बंद असणार आहे. यामध्ये वीकेंडच्या सुट्ट्यांचादेखील समावेश आहे. (Bank Holiday)
बँकांना ६ दिवस शनिवार- रविवारच्या सुट्ट्या असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार आहे. तसेच इतर सण-उत्सव, जयंतीमुळे फेब्रुवारीमध्ये बँका बंद असणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यात बँकांना सुट्ट्या
फेब्रुवारी महिन्यात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जायचे असेल तर सुट्ट्यांची यादी चेक करा.
फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्या (Bank Holidays In February)
सोमवार ३ फेब्रुवारी- आगरताळामध्ये सरस्वती पूजानिमित्त बँका बंद राहणार आहे
मंगळवार ११ फेब्रुवारी- चेन्नईत थाईपुसमनिमित्त बँका बंद राहणार आहे
१२ फेब्रुवारी- शिमल्यात संत रविदास जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहे
शनिवार, १५ फेब्रुवारी- इंफालमध्ये लोई-नगाई-नीनिमित्त बँक बंद राहणार आहे
१९ फेब्रुवारी, बुधवार- बेलापुर, मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत
२० फेब्रुवारी- आयजॉल आणि इटानरमध्ये राज्य दिवसनिमित्त बँका बंद राहणार आहे
२६ फेब्रुवारी- अहमदाबाद, आयजोल, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, देहारादून, हैदराबाद, शिमला, श्रीनगर, त्रिरुवनंतपुरम या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त बँका बंद असणार आहे.
वीकेंडची सुट्टी
रविवार २ फेब्रुवारी रोजी सुट्टी असणार आहे. ८ आणि ९ फेब्रुवारीला दुसरा शनिवार आणि रविवारी सुट्टी असणार आहे. १६ फेब्रुवारीला रविवारी सुट्टी असणार आहे. २२ आणि २३ फेब्रुवारीला चौथा शनिवार आणि रविवारनिमित्त सुट्टी असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.