Bank Holdiays: डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? वाचा वर्षअखेरच्या महिन्यातील सुट्ट्यांची यादी

December 2025 Bank Holiday Calendar: डिसेंबर २०२५ मध्ये १८ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. यात ख्रिसमस आणि विविध राज्यनिहाय सणांचा समावेश आहे.
December 2025 Bank Holiday Calendar
December 2025: Banks to remain closed for 18 days; check the full holiday list before planning your work. Google
Published On
Summary
  • डिसेंबर २०२५ मध्ये बँका एकूण १८ दिवस बंद राहणार

  • ख्रिसमससह विविध धार्मिक आणि प्रादेशिक सणांचा समावेश.

  • महत्त्वाची बँकिंग कामे आगाऊ पूर्ण करण्याचा सल्ला.

वर्ष २०२५ च्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात बँकेतील काही कामांचं नियोजन करत असाल तर बँकांना सुट्टी कधी आहे हे जाणून घ्या.

December 2025 Bank Holiday Calendar
EPFO News: काही मिनिटांत काढा पीएफ; त्याआधी हे काम कराच; वाचा सविस्तर

बँका कोणत्या दिवशी बंद राहणार?

१ डिसेंबर : इंडिजिनस फेथ डे (अरुणाचल प्रदेश )

३ डिसेंबर : सेंट फ्रान्सिस झेविअर उत्सव (गोवा)

१२ डिसेंबर : पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवस (मेघालय)

१८ डिसेंबर : गुरु घासीदास जयंती (छत्तीसगड), यू सोसो थम पुण्यतिधी (मेघालय)

१९ डिसेंबर : गोवा मुक्ती दिवस (गोवा)

२४ डिसेंबर : ख्रिसमस ईव (मेघालय, मिझोरम)

२५ डिसेंबर : ख्रिसमस (बहुतांश राज्यात बँकांना सुट्टी)

२६ डिसेंबर : ख्रिसमस सेलीब्रेशन (मेघालय, मिझोरम, तेलंगाणा) शहीद उधमसिंह जयंती (हरियाणा)

December 2025 Bank Holiday Calendar
New Labour Rules : पीएफ वाढणार, पण हातात येणारा पगार कमी होणार, नव्या कामगार कायद्यामुळे CTC चं गणित बदलणार

२७ डिसेंबर : गुरु गोविंद सिंह जयंती (हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश )

३० डिसेंबर : यू कियांग नांगबाह दिवस (मेघालय) तामू लोसर (सिक्कीम)

३१ डिसेंबर : नववर्ष स्वागत (मिझोरम, मणिपूर )

दरम्यान, ७ डिसेंबर, १४ डिसेंबर, २१ डिसेंबर, २८ डिसेंबरला रविवार असून साप्ताहिक सुट्टी असेल. तर, १३ डिसेंबर आणि २७ डिसेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार निमित्त बँकांना सुट्टी असेल.

दरम्यान बँकांना सुट्टी असेल तर ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहार करू शकता. एटीएममधून रोख रक्कम काढू शकता. आता बहुतांश व्यवहार यूपीआय द्वारे होत असल्यानं बँका बंद असल्याची फार अडचण येत नाही .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com