Bajaj Pulsur NS400Z: पॉवरफुल आणि सर्वात वेगवान Pulsur NS400Z लाँच; जाणून घ्या किंमत

Bajaj Pulsur NS400Z Price: देशातील बजाज ही आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आपली सर्वात शक्तीशाली बाईक Pulsar NS400Z लाँच केली आहे. ही बाईक आकर्षक लूक, पॉवरफुल इंजिन आणि नवीन फीचर्ससह लाँच केली गेली आहे.
Bajaj Pulsur NS400Z
Bajaj Pulsur NS400ZGoogle
Published On

देशातील बजाज ही आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आपली सर्वात शक्तीशाली बाईक Pulsar NS400Z लाँच केली आहे. ही बाईक आकर्षक लूक, पॉवरफुल इंजिन आणि नवीन फीचर्ससह लाँच केली गेली आहे.

Pulsur NS400Z या बाईकची सुरुवातीची किंमत 1.85 लाख रुपये आहे. कंपनीच्या या बाईकच्या किंमती भविष्यात वाढू शकतात. या नवीन Pulsur NS400Z बाइकचे अधिकृत बुकिंग सुरु झाले आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपद्वारे ५००० रुपये बुकिंग रक्कम देऊन ही बाईक खरेदी करु शकता. कंपनी लवकरच या बाईकची डिलिव्हरी सुरु करणार आहे.

Pulsur NS400Z बाईक ४ वेगवेगळ्या रंगामध्ये सादर करण्यात आली आहे. बजाज पल्सर NS400z ची हेडलाइट आकर्षक अनोख्या स्टाईलमध्ये आहे. या हेडलाइटच्या मध्यभागी एलईडी प्रोजेक्टर लाइट लावण्यात आली आहे. बाईकला एक आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. या बाईकचा लूक NS200 सारखाच आहे. स्पोर्टी रिअर व्ह्यू मिरर, गोल्डन फिनिशसह अप साइड डाउन (USD) फ्रंट फोर्क सस्पेंशन आणि इंधनाची टाकी देण्यात आली आहे. यामुळे कारला अधिकच स्पोर्टी लूक आला आहे.

Bajaj Pulsur NS400Z
Google Pixel 8a: गुगल करणार Pixel 8 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन लाँच; फीचर्स झाले लीक

Pulsur NS400Z बाईकमध्ये कंपनीने 373cc क्षमतेचे लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 40bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिम 6- स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. हे इंजिम स्लिप असिस्ट कल्च सिस्टिमसोबत येते. कंपनीच्या या नवीन कारची टॉप स्पीड 154 किलोमीटर प्रति तास आहे.

Bajaj Pulsur NS400Z
Petrol Diesel Price Today: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्रातील भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com