Avdhut Sathe: ट्रेड गुरु अवधूत साठेंवर SEBIची मोठी कारवाई! ५४६.२ कोटी वसूलीचे आदेश

SEBI Action on Avdhut Sathe Seize 546 Crore: सेबीने ट्रेड गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवधूत साठे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ५४६ कोटी रुपये वसूलीचे आदेश दिले आहे.
Avdhut Sathe
Avdhut SatheSaam Tv
Published On
Summary

ट्रेड गुरु अवधूत साठेंवर कारवाई

५४६. २ कोटींची वसूली करण्याचे आदेश

सेबीने केली मोठी कारवाई

शेअर मार्केटच्या माहितीबाबत सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात सेबीने कडक कारवाई केली आबे. सेबीने अवधून साठे यांच्यावर कारवाई केली आहे. ट्रेडिंगचे गुरु मानले जाणाऱ्या अवधून गुप्ते यांच्याकडून ५४६.२ कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहे. याशिवागी सेबीने त्यांना नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला आणि संशोधन विश्लेषण करण्यासही मनाई केली आहे.

सेबीच्या पुढच्या आदेशापर्यंत त्यांना सिक्युरिटीज मार्केटमधून बाहेर पडण्यासदेखील मनाई केली आहे. सेबीने याप्रकरणी १२५ पानांचा आदेश जारी केला आहे.

Avdhut Sathe
SIP Calculator: महिन्याला इतक्या रुपयांची SIP करा; १० वर्षांत मिळतील १ कोटी; वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

सेबीच्या म्हणण्यांनुसार, या दोन्ही ट्रेडिंग संस्थांनी ३.४ लाख गुंतवणूकदारांकडून ६०१ कोटींपेक्षा जास्त रक्क घेतली आहे. त्यांना आवश्यक माहिती मिळाली नाही तसेच गुंतवणूक सल्ला आणि स्टॉक विश्लेषणाद्वारे त्यांची दिशाभूल केली आहे. त्यांना शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यास सांगितले. परंतु सेबीच्या म्हणण्यांनुसार, जर संस्था हे काम करत असेल तर त्यांना सिक्युरिटीज कायद्यांचे पालन केले पाहिजे.

सेबीने (SEBI)आदेशात म्हटलंय की, या संस्था शेअर मार्केच्या शिक्षणाच्या नावाखाली नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषणाच्या सेवा देत होत्या. प्रशिक्षणाच्या कालावधीत त्या मार्केट डेटा वापरत होत्या. या संस्था गुंतवणूकदारांकडून खूप शुल्क आकारत होत्या. दरम्यान, सेबीला असे आढळून आले की, या संस्था सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि जाहिराती पसरवत होत्या.

Avdhut Sathe
Share Market Today: शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स १३०० तर निफ्टी ४०० अंकानी घसरला

२०२४ मध्ये केली होती चौकशी

२०२३-२४ आर्थिक वर्षात अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी आणि अवधूत साठे यांची सेबीने चौकशी केली आहे. या दोन्ही संस्थांनी गुंतवणूकदारांना व्यव्हार करण्यास सांगितले. त्यांना नफा मिळवून देण्याचा दावा केला. परंतु सेबीच्या तपासणीत दिसून आले की गुंतवणूकदारांना नफा होत नव्हता तर त्यांना फक्त तोटा सहन करावा लागत होता.यासाठी सेबीने इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याला न जुमानता दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येत होते. त्यामुळेच सेबीने ही कारवाई केली.

Avdhut Sathe
Share Market: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं आधी गडगडला नंतर सावरला; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये उसळी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com