भन्नाटच! ATM कार्डवर १० लाखांचा मोफत विमा, जाणून घ्या कसा घ्याल लाभ

ATM Card Insurance: एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातम आहे. एटीएम कार्डधारकांना १० लाखांपर्यंतचा मोफत विमा मिळतो.
ATM
ATM Saam Tv
Published On

सध्या जवळपास सर्वचजण एटीएम कार्डचा वापर करतात. गावा खेड्यापासून ते शहरातील प्रत्येक व्यक्तीकडे एटीएम कार्ड हे असतेच. एटीएम कार्डचा वापर करुन आपण पैसे काढू शकतो. पीएम जन धन योजनेमुळे गावातील प्रत्येक व्यक्तीकडे रुपे कार्ड आहे. त्यामुळे आता पैसे घेऊन जाण्याची गरज भासत नाही. एटीएम कार्डमुळे पैसे काढण्यासोबतच अनेक सुविधा मिळतात.

एटीएम कार्डमध्ये तुम्हाला प्रिमियम न भरता आरोग्य विमा मिळतो.बँकेकडून ग्राहकांना एटीएम कार्ड दिले जाते. त्याचवेळी कार्ड होल्डर्संना अपघात विमा आणि मृत्यूचा विमा दिला जातो. याबाबत देशातील अनेक लोकांना माहित नाही. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, डेबिट कार्ड धारकांना अकाली मृत्यूसाठी विमा दिला जातो. (ATM Card insurance)

ATM
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

एटीएम कार्डवर मोफत विमा

जर तुम्ही बँकेचे एटीएम कार्ड ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले असेल तर तुम्हाला मोफत विमा सुवधा मिळतो. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा या दोघांचाही समावेश आहे.तुमच्या कार्ड श्रेणीनुसार तुम्हाला विम्याच रक्कम दिली जाते.एसबीआयने आपल्या गोल्ड एटीएम धारकांना ४ लाखांचा (Death On Air) विमा दिला जातो. तर २ लाख रुपये (Non Air) कव्हर दिले जाते. तर प्रिमियम कार्डधारकांना १० लाख रुपयांचा विमा दिला जातो. तर नॉन एअरसाठी ५ लाख रुपयांचे कव्हर दिले जाते.

प्रत्येक बँक एटीएम कार्डवर वेवेगळ्या रक्कमेचे कव्हर देतात. काही एटीएम कार्ड तर ३ कोटी रुपयांचा अपघाती विमा संरक्षण देतात. (ATM Card Accidental Insurance)

ATM
5 Central Government Schemes: केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ

विमा कधी मिळणार?

तुम्हाला डेबिट कार्डवरील विमा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही डेबिट कार्डद्वारे ठरावीक काळात काही व्यव्हार केलेले असतात. वेगवेगळ्या कार्डसाठी हा कालावधी बदलू शकतो. विमा पॉलिसी सक्रिय करण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांतून एकदा तरी व्यव्हार करणे आवश्यक आहे. तर काही कार्डधारकांना विमा संरक्षण सक्रिय करण्यासाठी ९० दिवसात व्यव्हार करावे लागतात.

ATM
Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com