Atal Pension Yojana : निवृत्तीनंतर ₹१००० ते ५००० रू. हमखास मिळणार, जाणून घ्या पात्रता काय, कसा कराल अर्ज?

Atal Pension Yojana Retirement Plan: अटल पेन्शन योजनेत सामील होऊन निवृत्तीनंतर दरमहा १००० ते ५००० रूपये पेन्शन मिळवा. पात्रता, नोंदणी प्रक्रिया व फायदे जाणून घ्या आणि भविष्य सुरक्षित करा.
Atal Pension Yojana Retirement Plan
Atal Pension YojanaSaam Tv
Published On

निवृत्तीनंतर भविष्याचे आर्थिक नियोजन करणे महत्वाचे असते. अनेकांना निवृत्तीनंतर खर्च कसे भागेल याचा प्रश्न असतो. नोकरीला असताना पगार मिळतो मात्र निवृत्तीनंतर काय असा प्रश्न कायमच असतो. निवृत्तीनंतर उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात म्हणून दैंनदिन खर्चासाठी पुरेसे मासिक पेन्शन महत्वाचे असते. यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिना एक निश्चित रक्कम जमा करतात. यानुसार निवृत्तीनंतर त्यांना १००० रू ते ५००० रू पर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते. मात्र या भारत सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

Atal Pension Yojana Retirement Plan
LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट ज्यांना निवृत्तीनंतर कोणतेही फायदे मिळत नाही त्याच्यासांठी आर्थिक मदत करणे आहे. योजनेची नोंदणी करण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभार्थी झाल्यानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन स्लॅबनुसार एक ठरवलेली रक्कम जमा करावी लागणार आहे.

६० वर्ष ओलांडल्यानंतर, मासिक १००० रू ते ५००० रू पेन्शन मिळणार आहे. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्यांच्या पार्टनरला ही रक्कम मिळते आणि जर दोघेही पात्र नसतील तर नामनिर्देशित व्यक्तीला जमा झालेली रक्कम मिळते.

Atal Pension Yojana Retirement Plan
Surya Grahan 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी ठरेल घातक, होतील वाईट परिणाम

अटल पेन्शन योजनेत पैसे गुतंवणूक करणे सोपे आहे. यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आगे. तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरावा लागणार आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर वापरून पडताळणी केली जाईल. ECS द्वारे दरमहा प्रिमियम आपोआप कापला जाईल. तुम्हाला अर्ज करायचा असलेला पेन्शन स्लॅब निवडा. मासिक हप्ता त्यानुसार निश्चित केला जाईल. उदाहरणार्थ, जर कोणी २० वर्षांच्या वयात सामील झाला तर त्याला १,००० रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त ४२ रुपये द्यावे लागतील. तथापि, जर त्याने ५,००० रुपयांचा पेन्शन स्लॅब निवडला तर प्रीमियम वाढेल.

Atal Pension Yojana Retirement Plan
TVS Ev Smartwatch: स्कूटरची चार्जिंग संपली, टायर पंक्चर झालाय? तुम्हाला झटक्यात कळलेल; TVS ईव्ही स्मार्टवॉच लाँच, किंमत किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com