iPhone 17 Launch Date: iPhone 17 येतोय, 'या' तारखेला होणार लाँच, स्लिम 17 Air सुद्धा धडकणार

iPhone Slim 17 Air: आयफोन १७ सिरीजच्या लाँचिंगची माहिती लीक झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार असून, आयफोन १७, १७ एअर, १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्स सादर होतील.
iPhone 17 Launch Date: iPhone 17 येतोय, 'या' तारखेला होणार लाँच, स्लिम 17 Air सुद्धा धडकणार
Published On
Summary
  • आयफोन १७ ची लाँचिंग ९ सप्टेंबर २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे.

  • या सिरीजमध्ये स्लिम डिझाइनचा आयफोन १७ एअर देखील समाविष्ट आहे.

  • आयफोन १७ एअरमध्ये सिंगल रियर कॅमेरा आणि हलकी जाडी आहे.

  • Apple च्या नवीन सिरीजमध्ये १७, १७ एअर, १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्स असे चार मॉडेल्स असतील.

Apple कंपनी लवकरच आपल्या नवीन iPhone 17 आणि iPhone 17 Pro सिरीजची लाँचिंग करणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या ट्रेंडनुसार, Apple प्रत्येक वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन मॉडेल्स बाजारात आणते. या वर्षी देखील अशाच प्रकारे सप्टेंबरमध्ये नवीन फोन सादर होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहिती नुसार, कंपनीचा मोठा लाँच कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाऊ शकतो, मात्र अजूनपर्यंत Apple कडून याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

जर्मन वेबसाइट फोन-टिकरने आपल्या अहवालात गुप्त सूत्रांवरून ही लाँच तारीख उघड केली असून, Apple लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करेल, असे सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी iPhone 17 सिरीजसोबत iPhone 17 Air नावाचा एक नवीन स्मार्टफोन देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हा फोन स्लिम थीमवर आधारित असून, लीक नुसार यात सिंगल रियर कॅमेरा सेन्सर असू शकतो.

iPhone 17 Launch Date: iPhone 17 येतोय, 'या' तारखेला होणार लाँच, स्लिम 17 Air सुद्धा धडकणार
Whatsapp: भारतामधील तब्बल ९८ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स बंद, तुमचे खाते तर नाही ना? जाणून घ्या कारण

iPhone 17 Air हा फ्लॅगशिप ग्रेडचा स्मार्टफोन असेल आणि iPhone 17 Plus च्या जागी येऊ शकतो, तरीही याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. iPhone 17 Air सॅमसंगच्या Galaxy S25 Edge शी स्पर्धा करणार आहे, जो भारत आणि जागतिक बाजारपेठेत आधीच लाँच झाला आहे.

iPhone 17 Launch Date: iPhone 17 येतोय, 'या' तारखेला होणार लाँच, स्लिम 17 Air सुद्धा धडकणार
Spam Calls: वारंवार येणाऱ्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड कॉल्समुळे वैतागलात ? मग 'हे' अॅप आताच डाउनलोड करा

Samsung Galaxy S25 Edge हा सॅमसंगच्या सर्वात स्लिम स्मार्टफोनपैकी एक आहे, ज्याची जाडी केवळ 5.8 मिमी आणि वजन 163 ग्रॅम आहे. त्यामुळे iPhone 17 आणि iPhone 17 Air या दोन्ही मॉडेल्सच्या लाँचिंगसाठी तंत्रज्ञान प्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. आगामी काळात Apple कडून या फोनबाबत अधिकृत माहिती आणि वैशिष्ट्ये समोर येण्याची शक्यता आहे.

Q

आयफोन १७ कधी लाँच होणार आहे?

A

आयफोन १७ ची लाँचिंग तारीख ९ सप्टेंबर २०२५ अशी अनुमानित आहे.

Q

आयफोन १७ एअर काय आहे?

A

आयफोन १७ एअर हा एक स्लिम थीमवर आधारित स्मार्टफोन आहे जो आयफोन १७ सिरीजचा भाग आहे.

Q

आयफोन १७ एअरची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत?

A

या मॉडेलमध्ये सिंगल रियर कॅमेरा, हलकी जाडी आणि फ्लॅगशिप ग्रेड परफॉर्मन्स अपेक्षित आहे.

Q

आयफोन १७ सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स असतील?

A

आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश असेल.

iPhone 17 Launch Date: iPhone 17 येतोय, 'या' तारखेला होणार लाँच, स्लिम 17 Air सुद्धा धडकणार
iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com