Apple Store : मुंबई, दिल्लीनंतर महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सुरु होणार अ‍ॅपलचे नवे स्टोअर्स

Buisness News : दिल्ली, मुंबईनंतर अ‍ॅपलने महाराष्ट्रात नवे स्टोअर्स उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येथे आयफोन, मॅकबुक, आयपॅडसह सर्व प्रॉडक्ट्स उपलब्ध असून ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभव, तज्ञांची मदत आणि मोफत क्रिएटिव्ह वर्कशॉप्स मिळणार आहेत.
Apple Store : मुंबई, दिल्लीनंतर महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सुरु होणार अ‍ॅपलचे नवे स्टोअर्स
Buisness NewsSaam tv
Published On
Summary
  • अ‍ॅपल २ सप्टेंबरला बंगळुरू आणि ४ सप्टेंबरला पुण्यात अधिकृत स्टोअर्स सुरू करणार.

  • पुण्यातील स्टोअर कोरेगाव पार्कमध्ये तर बंगळुरूमध्ये हेब्बल भागात असणार.

  • ग्राहकांना प्रॉडक्ट्ससह मोफत वर्कशॉप्स आणि तज्ञांची थेट मदत मिळणार.

  • आयफोन १७ मालिका भारतात तयार होणार असून निर्यातीतही वाढ होणार.

अ‍ॅपल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई आणि दिल्लीतील यशस्वी स्टोअर्सनंतर आता कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की, २ सप्टेंबर रोजी बंगळुरूमध्ये आणि ४ सप्टेंबर रोजी पुण्यात दोन नवे स्टोअर्स ग्राहकांसाठी सुरू होणार आहेत. या दोन्ही ठिकाणी उघडणारी स्टोअर्स ही केवळ खरेदीसाठी नसून, अ‍ॅपलचा अनुभव घेण्यासाठी एक विशेष केंद्र असतील.

पुणे हे आयटी आणि शिक्षणाचे हब म्हणून देशभरात ओळखले जाते. कोरेगाव पार्क भागात होणारे हे स्टोअर केवळ टेक-प्रेमींसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी, स्टार्टअप संस्थापकांसाठी आणि कॉर्पोरेट व्यावसायिकांसाठीही एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. येथे ग्राहकांना केवळ आयफोन, आयपॅड, मॅकबुक किंवा अ‍ॅपल वॉचसारखी उत्पादने खरेदी करता येणार नाहीत, तर प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. डिव्हाइस ट्राय करून पाहणे, एक्स्पर्ट्सशी संवाद साधणे आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी थेट तज्ञांशी चर्चा करण्याची सोय या स्टोअरमध्ये असणार आहे.

Apple Store : मुंबई, दिल्लीनंतर महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सुरु होणार अ‍ॅपलचे नवे स्टोअर्स
Apple Store iPhone Stolen: चोरांची ‘मनी हाईस्ट’ स्टाईल; बाथरूमखाली बोगदा खणून अॅपल स्टोअरमध्ये घुसले; 4.10 कोटी रुपयांचे 436 IPhone लंपास

अ‍ॅपलने नेहमीप्रमाणेच या नव्या स्टोअर्ससाठी विशेष आकर्षक बॅरिकेड डिझाईन्स तयार केले आहेत. पुण्यातील स्टोअरचे बॅरिकेड ‘मोर-प्रेरित डिझाईन’वर आधारित आहे, जे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते. तर बंगळुरूमधील स्टोअरच्या डिझाईनमध्ये स्थानिक कला आणि परंपरेचा समावेश केला गेला आहे. या डिझाईनवरून स्पष्ट होते की अ‍ॅपल भारतीय ग्राहकांना केवळ ग्लोबल ब्रँडचा अनुभव देत नाही, तर स्थानिक संस्कृतीशीही आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

Apple Store : मुंबई, दिल्लीनंतर महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सुरु होणार अ‍ॅपलचे नवे स्टोअर्स
Apple Store In India : मुंबईनंतर राजधानीत Apple Store चे उद्घाटन ! काळ्या-पिवळ्या टॅक्सीपासून मिळाली प्रेरणा...

ग्राहकांसाठी या दोन्ही स्टोअर्समध्ये “Today at Apple” या उपक्रमांतर्गत मोफत सेशन्स आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये फोटोग्राफी, म्युझिक प्रॉडक्शन, कोडिंग, स्केचिंग आणि क्रिएटिव्ह आर्ट्सशी संबंधित वर्कशॉप्स असतील. या उपक्रमामुळे ग्राहकांना तंत्रज्ञानाचा केवळ वापर करण्यापलीकडे जाऊन, त्यातून काहीतरी नवे शिकण्याची आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

Apple Store : मुंबई, दिल्लीनंतर महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सुरु होणार अ‍ॅपलचे नवे स्टोअर्स
Google Play Store वरुन 12 Apps लगेच करा डिलीट अन्यथा, बँक खाते होईल रिकामे

अ‍ॅपलची ही पावले केवळ रिटेल नेटवर्क विस्तारापुरती मर्यादित नाहीत. भारत आता उत्पादन आणि निर्यातीच्या दृष्टीने कंपनीसाठी धोरणात्मक केंद्र ठरत आहे. अ‍ॅपलने अलीकडेच जाहीर केले आहे की आयफोन १७ मालिका भारतात तयार होणार आहे. यामुळे ‘Made in India’ आयफोन्सला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी मिळू शकते. भारतात तयार होणारी उत्पादने केवळ स्थानिक मागणी पूर्ण करण्यापुरती मर्यादित राहणार नाहीत, तर निर्यातही वाढणार आहे. हे भारताला जागतिक टेक्नॉलॉजी सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाचे स्थान मिळवून देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com