
राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना २ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला.
हा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
नवरात्रौत्सवात मान्यता मिळाल्याने दिवाळीपूर्वीच रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी
Anaganwadi Workers Diwali Bonus : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा दिवाळी गोड होईल असे म्हटले जात आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. ही भेट दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँकेतील खात्यांमध्ये जमा होणार आहे. यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे महिला आणि बाल कल्याण आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना दिवाळीआधी बोनस दिला जाणार असल्याची शक्यता होती. बोनस कधी मिळणार हे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. अनेकदा दिवाळीनंतर ही बोनसची रक्कम बँक खात्यांमध्ये जमा होत असते. पण नवरात्र उत्सव काळात त्याला मान्यता घेऊन दिवाळीपूर्वीच बोनस बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले आहे.
दिवाळीपूर्वी बोनस देण्याबाबतच निर्णय गुरुवार (२५ सप्टेंबर) घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राज्यातील तब्बल १ लाख १० हजारांहून जास्त अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होतील. दिवाळीपूर्वीच राज्यातील अंगणवाडी ताईंना भाऊबीज भेट मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.