
Adani Group: भारतातील प्रमुख उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. या समूहाच्या अंतर्गत असणाऱ्या अदानी इंटरप्राइजेजने अदानी विल्मर लिमिटेड (Adani Wilmar LTD) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच काळापासून अदानी समूह हा अदानी विल्मर लिमिटेडमधील आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात होते. आता या गोष्टीवर समूहाने शिक्कामोर्तब केला आहे.
अदानी विल्मर लिमिटेड कंपनीमध्ये अदानी समूहाचा ४४ टक्के हिस्सा आहे. समूहाद्वारे कंपनीची विक्रीची प्रक्रिया दोन टप्प्यांद्वारे पूर्ण होईल. सध्या अदानी विल्मर कंपनीचा संपूर्ण हक्क लेन्स प्रा. लि. या कंपनीकडे आहे. ही कंपनी अदानी समूहाकडून त्यांचा हिस्सा खरेदी करणार आहे. पब्लिक शेयर होल्डिंगच्या नियमांनुसार हा व्यवहार पूर्ण होणार आहे.
एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचा व्यवहार झाला. याअंतर्गत अदानी कमोडिटी एलएलपीकडे (ACL) विल्मर कंपनीचा ३१.०६ टक्के हिस्सा आहे. हे शेअर्स लेन्स कपंनी खरेदी करणार आहे. उरलेल्या १३ टक्के शेअरची विक्की पब्लिक शेअर होल्डिंगचे नियमांच्या हिशोबाने केली जाईल.
सोमवारी शेअर बाजार बंद होण्याच्या वेळेस अदानी विल्मर कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईमध्ये ३२९.५० इतकी होती. मागील दोन वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये ४६ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कारणामुळे अदानी समूहाने या कंपनीचे सर्व मालकहक्क विकण्याचा निर्णय घेतला.
अदानी समूहाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे नाव बदल्यात येणार आहे. या कंपनीचे नवीन नाव एडब्लूएल एग्री बिझनेस लिमिटेड किंवा फॉर्च्यून एग्री बिझनेस लिमिटेड असू शकते असे म्हटले जात आहे. व्यवहार पूर्ण झाल्यावर हे निर्णय घेतले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.