
Koregaon Bhima Shaurya Divas: १ जानेवारी २०२५ रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संपन्न होणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गावर बदल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरला दुपारी २ वाजल्यापासून हे बदल अंमलात आणले जाणार आहेत.
वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतुकीच्या मार्गांवरील बदलांची माहिती दिली. "नव्या बदलेल्या मार्गिकेची माहिती असलेले होर्डिंग बोर्ड रस्त्यांवर लावले जातील. चालकांनी नव्या मार्गांवर वाहतूक करावी", असे अमोल यांनी सांगितले. शिवाय त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वाहुतकीच्या मार्गांवरील बदल:
१. पुणे ते अहिल्यानगर (अहमदनगर) महामार्गावरील वाहनांनी खर्डी बायपास रोडचा वापर करत मुंधवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रोड, केडगाव चौफुला, नव्हरे आणि शिरुर या मार्गाने प्रवास करावा.
२. आळंदी आणि चाकण व्हाया सोलापूर रोडवरुन जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौत आणि खर्डी बायपास रोडहून विश्रांतवाडीहून प्रवास करत आळंदी आणि चाकणला जावे.
३. मुंबईवरुन पुण्याला जाणाऱ्यांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा हा मार्ग स्विकारावा. हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ आणि शिरुर मार्गाने शहरात यावे.
४. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कात्रजहून येणाऱ्यांनी मांतरवाडी फाटा, मगरपट्टा चौकहून येत शिरुरवरुन हडपसर व्हाया केडगाव चौफुलाहून प्रवास करावा.
याशिवाय वाहतुकीच्या मार्गात खालील बदल केले जाणार आहेत.
१. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल अवजड वाहनांसाठी बंद राहील. तर हलकी वाहने पूलावरुन प्रवास करु शकतील.
२. वाघोली व्हाया विश्रांमवाडी आणि लोहगाव या मार्गावरील अवजड वाहनांचा मार्ग बदलण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.