Pune : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पाठवलेल्या निमंत्रणासोबत कंडोम, पुण्यात नव्या वादाला तोंड

new year celebration in pune : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील एका पबने अनेकांना निमंत्रण पाठवले, त्या निमंत्रण पत्रिकासोबत पाठवलेल्या भेटवस्तूमुळे वाद निर्माण झालाय.
Pubs and Bar Entry :
Pubs and Bar Entry :yandex
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

New Year Celebration In Pune : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काहीजण पबमध्ये जातात. पुण्यातील एका पबने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीमध्ये दिलेल्या भेटवस्तूची चर्चा होतेय. हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीमध्ये निमंत्रिकांना कंडोम देण्यात आले, याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जनजागृतीसाठी हा निर्णय घेतल्याचे पब वाल्यांकडून सांगण्यात आले. पण त्याविरोधात काही जणांनी तक्रार केली आहे.

नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे, मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

"पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे," असे या पत्रात लिहले आहे. "अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे," असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com