Aadhar Update News : आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल! नव्या फॉर्मद्वारे करता येणार घर बसल्या माहिती अपडेट

New Rule For Updation : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार नोंदणी आणि अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवे आधार काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या नोंदणी आणि ते जूने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन फॉर्म जाहीर केले आहेत.
Aadhar Update News
Aadhar Update NewsSaam Tv
Published On

Aadhar Update :

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार नोंदणी आणि अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवे आधार काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या नोंदणी आणि ते जूने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन फॉर्म जाहीर केले आहेत.

अशातच आता जर कोणी आधार अपडेट (Update) करत असेल किंवा नवीन आधार बनवण्यासाठी अर्ज केला असेल तर त्याला आता नवीन फॉर्म भरावा लागेल. एवढेच नाही तर एजन्सीकडून यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यात भारतीय रहिवासी आणि अनिवासी भारतीय यांसाठीही सारखेच नियम लागू होतील.

नवीन नियमांमुळे आता आधार कार्डमधील नाव, पत्ता इत्यादी डेमोग्राफिक डेटा अपडेट करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. नवीन नियम केंद्रीय ओळख डेटामध्ये माहिती अपडेट करण्याचे दोन मार्ग प्रदान करतात. तुम्ही ते ऑनलाइन (Online) वेबसाइटद्वारे किंवा नावनोंदणी केंद्राला भेट देऊन पूर्ण करू शकता.

UIDAI ने केले हे बदल

UIDAI च्या नवीन नियमांनुसार, आता आधार कार्डधारक ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडद्वारे सहजपणे माहिती अपडेट करू शकतात. सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (CIDR) मधील माहिती अपडेट करण्यासाठी, तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन किंवा मोबाइल अॅप्लिकेशन आणि UIDAI वेबसाइटद्वारे अपडेट करू शकता.

Aadhar Update News
Aadhar Card | जन्मतारखेच्या पुराव्यासाठी Aadhar Card चा "आधार" नाही, EPFO काय म्हणतंय? #adharcard

तसेच जुन्या नियमांमध्ये, पत्त्याच्या अपग्रेडेशनचा पर्याय फक्त ऑनलाइन मोडमध्ये प्रदान करण्यात आला होता. आणि इतर तपशील अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागायचे. तर आता तुम्ही ते काम घरबसल्या करू शकता. भविष्यात मोबाईल नंबर ऑनलाईन देखील अपडेट केला जाण्याची शक्यता आहे.

नामांकनासाठी नवीन फॉर्म

आधार नोंदणी आणि आधार तपशील अपडेट करण्यासाठी नव्या नियमांनुसार नवीन फॉर्म आणण्यात आला आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी हा फॉर्म वापरण्यात येईल. तुमच्याकडे आधीपासून आधार कार्ड असल्यास, तुम्ही इतर तपशील अपडेट करण्यासाठी फॉर्म 1 वापरू शकता.

Aadhar Update News
Aadhar Card: आधार कार्ड क्रमांक नसतानाही सोप्या पद्धतीने करा eKYC; या स्टेप्स करा फॉलो

तर अनिवासी भारतीयांसाठी फॉर्म 2 चा वापर करण्यात येईल. भारतीय पत्ता असलेले अनिवासी भारतीय फॉर्म 3 वापरू शकतात, ज्यांचे वय 5 ते 18 वर्षे दरम्यान आहे असे अनिवासी भारतीयांची मुलं फॉर्म 4 वापरू शकतात. विविध श्रेणींसाठी फॉर्म 5,6,7,8 आणि 9 जारी करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com