8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्र सरकारची माहिती

8th Pay Commission Update: आठव्य वेतन आयोगाची सरकारी कर्मचारी वाट बघत आहेत. आठव्या वेतन आयोगाची घोषणा होऊन बरेच दिवस झाले तरीही आयोगाची स्थापना अद्याप झालेली नाही.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली माहिती

केंद्र सरकारने ८व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) घोषणा केली जानेवारी महिन्यातच केली आहे. दरम्यान, अजून आठव्या वेतन आयोगाच्या कामाबाबत कोणतीही प्रोसेस सुरु झाल्याचे दिसत नाही. अजून टर्म्स ऑफ रेफरन्स लागू केले नाही. तयाचसोबत आयोगाची समितीदेखील स्थापन झालेली नाही. आयोगाची समिती लवकरच स्थापन केली जाईल. दरम्यान याबाबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी माहिती दिली आहे.

8th Pay Commission
EPFO News: पीएफचे पैसे काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागणार? जाणून घ्या नवीन नियम

पंकज चौधरी यांनी सांगितले की, ८व्या वेतन आयोगाबाबत अधिसूचना योग्य वेळी जारी केली जाईल. आयोगाच्या स्थापनेनंतर अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्र सरकारने सांगितले की, ते राज्य सरकारशी सल्लामसलत करत आहे आणि आयोगाच्या स्थापनेबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे.

फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor)

आठव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल. हा एक गणना केलेला गुणांक असतो. हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वेतन आणि पेन्शन निश्चित करतो. नवीन वेतन = मूळ वेतन × फिटमेंट फॅक्टर या आधारे पगार वाढतो.

8th Pay Commission
Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

महागाई भत्ता

महागाई भत्तादेखील दर वर्षी दोनदा वाढतो. सध्या महागाई भत्ता हा ५८ टक्के आहे. हा महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर बेस फिटमेंट फॅक्टर १.६० असेल तेव्हा पगार १० ते ३० टक्क्यांनी वाढेल. जर १.६० मध्ये २० टक्क्यांनी वाढ केली तर नवीन फिटमेंट फॅक्टर १.९२ होईल. यात ३० टक्क्यांनी वाढ केल्यास तो २.०८ होऊ शकतो. यामुळे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८ ते २.०८ पर्यंत होऊ शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com