DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता वाढणार; पण कितीने? वाचा सविस्तर

8th Pay Commission DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाणार आहे. वर्षभरात दोनदा जानेवारी आणि जूनमध्ये महागाई भत्ता वाढवला जातो.
DA Hike:
DA Hike:Saam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

लवकरच महगाई भत्ता वाढणार

जानेवारी २०२६ पासून होणार लागू

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ते वाढवले जातात. वर्षभरात जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. दरम्यान, हा महागाई भत्ता इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रीयल वर्कर्स (AICPI-IW) वर आधारित असतो. आता लवकरच जानेवारी २०२६ चा महागाई भत्ता वाढणार आहे.

DA Hike:
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता वाढणार

केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यावेळी महागाई भत्ता आणि महागाई राहतमध्ये दिलासा मिळणार आहे. यामध्ये २-२ टक्क्यांनी केली जाऊ शकत.दरम्यान, यामुळे पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.

कंज्युमर प्राइस इंडेक्स काय असते?

भारतात दोन प्रकारच्या महागाईचे प्रकार असतात. एक म्हणजे रिटेल आणि दुसरा होलसेल प्राइस इंडेक्स. रिटेल महागाई ही सर्वसामान्य ग्राहकांना दिलेल्या किंमतीवर असते. यालाच कन्ज्युमर प्राइस इंडेक्स म्हणतात.

DA Hike:
Fact-Check: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल? 8व्या वेतन आयोगात DA-बेसिक मर्ज होणार?

आता किती वाढणार महागाई भत्ता?

मागच्या वेळी जून २०२५ मध्ये महागाई भत्ता वाढला होता. हा महागाई भत्ता AICPI-IW च्या आकड्यानुसा वाढला होता. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली होती. हा महागाई भत्ता ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाला होता. यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के झाला. यानंतर आता डिसेंबरच्या महागाईवर हा महागाई भत्ता वाढणार आहे. जर कंज्युमर इंडेक्स ७ पॉइंटने घसरला तर महागाई भत्त्यात १ टक्क्यांनी वाढ होईल. जर इंडेक्स २४ पॉइंटने वाढला तर ३ टक्क्यांनी वाढ होईल.

DA Hike:
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com