Fact-Check: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल? 8व्या वेतन आयोगात DA-बेसिक मर्ज होणार?

Central Government Merging DA with Basic Pay: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल करण्यात आलाय. होय, डीए आणि बेसिक पे आता मर्ज केला जाणार असल्याचा दावा केलाय.पण, खरंच केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Central Government Merging DA with Basic Pay
Viral message claiming DA–Basic Pay merger debunked; government clarifies no such decision taken.Saam tv
Published On
Summary
  • डीए आणि बेसिक पे मर्ज केल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल

  • केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगात कोणताच बदल केला नाहीये.

  • सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठा बदल करण्यात आल्याचा दावा केलाय. 8 व्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जाणार असल्याचा दावा केलाय. पण, खरंच असा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, बेसिक आणि महागाई भत्ता एकत्र झाला तर पगारात फरक पडू शकतो.सध्या हातात मिळणारा पगार कमी मिळेल. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

8 वा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. DA आणि DR बेसिक पेमध्ये मर्ज करण्यासाठी सरकारला प्रस्ताव दिलाय. देशभरात करोडो सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आहेत. त्यामुळे याची सत्यता सांगण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. बेसिक आणि डीए एकत्र केल्यास काय परिणाम होऊ शकतो हेदेखील पाहुयात.

Central Government Merging DA with Basic Pay
Eknath Shinde Meets Sonia Gandh: शिंदेंनी घेतली सोनिया गांधींची भेट? एकनाथ शिंदेंची काँग्रेससोबत आघाडी?

DA-बेसिक मर्ज केल्यास काय होईल?

12 टक्क्याने पीएफ जास्त कापला जाईल

बेसिक वाढल्याने इन्कम टॅक्स वाढू शकतो

DA स्वतंत्रपणे वाढणार नाही

DA मधली नेहमीची 4-5% वाढ मिळणार नाही

पगार वाढीचा वेगही कमी होईल

Central Government Merging DA with Basic Pay
DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

डीए आणि बेसिक पे मर्ज झाल्यामुळे हे परिणाम होऊ शकतात. मात्र, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

8वा वेतन आयोग 2026 पासून लागू होण्याची शक्यता

DA आणि बेसिक पे मर्ज होणार नाही

DA-मूळ वेतनात विलीन करण्याचा प्रस्ताव नाही

किमान पगार 30 हजारपर्यंत जाऊ शकतो

देशभरात 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेंशनर्स धारक आहेत. मात्र, डीए आणि मूळ वेतन मर्ज करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत DA आणि बेसिक पे मर्ज होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com