5G Data Recharge: अनलिमिटेड फ्री 5G इंटरनेटवर येणार लिमीट? Jio-Airtel चे रिचार्ज महाग होण्याची शक्यता

Jio-Airtel : पुढील काही दिवसात मोफत 5G इंटरनेट वापरणं महाग होऊ शकतं. रिलायन्स जिओ आणि एअरटेल २०२४ च्या उत्तरार्धात अमर्यादित 5G ऑफर बंद करतील असं सांगितलं जात आहे. मोबाईल रिचार्जची किंमतही वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या नफा वाढवण्यासाठी ही पावले उचलू शकतात.
Jio-Airtel   5G
Jio-Airtel 5GET
Published On

5G Data Recharge Reliance jio Airtel:

5G इंटरनेट वापरणाऱ्या करोडो भारतीय ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसात ५ जी फ्री सेवा बंद होण्याची शक्यता आहे. यापुढे 5G ची सेवा वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल त्यांचे अमर्यादित 5G डेटा प्लॅन बंद करणार असल्याचं सांगितलं जात आहे. २०२४ च्या शेवटी ही फ्री अनलिमिटेड डेटाची ऑफर बंद होण्याची शक्यता आहे. (Latest News)

ज्या ग्राहकांना ५ जी सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना रिचार्ज करा लागेल. इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या बाजारात ४ जीसाठी करण्यात येणारे रिचार्जची जी किंमत आहे, त्याच्या तुलनेत ५ जी चे रिचार्ज हे ५ ते १० टक्क्यांनी महागतील असं म्हटलं जात आहे. रिचार्जचे दर वाढवल्याने कमाईला चालना मिळेल आणि महसूल वाढेल असे जाणकारांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीने ऑक्टोबर २०२२ मध्ये भारतात ५ जी सेवा सुरू केली होती. तेव्हापासून दोन्ही कंपन्या सध्याच्या ४ जी दरांवर ५ जी इंटरनेट सेवा दिल्या जात आहेत. अमर्यादित ५ जी डेटासाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेतले जात नाही. देशातील या दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना संपूर्ण देशात ५ जी सेवा लागू करण्याचं उद्देश आहे. सध्या देशभरात १२.५ कोटी ५ वापरकर्ते आहेत. दरम्यान या कंपन्यांचे उद्देश कमाई वाढवण्यावर आहे.

भारतात ५ जी क्रांती आणण्याचे श्रेय रिलायन्स जिओ आणि एअरटेललाही जाते. दोन्ही कंपन्यांनी देशात ५ जी सेवा पुरविण्यात आघाडी घेतली. २०२४ च्या अखेरीस भारतातील ५ जी ​​वापरकर्त्यांची संख्या २० कोटींच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे ५ जी प्लॅन सध्याच्या ४ जी प्लॅनपेक्षा ५ ते १० टक्क्यांनी महाग असू शकतात. तसेच दोन्ही कंपन्या ३० ते ४० टक्के अधिक डेटा देऊ शकतात.

Jio-Airtel   5G
Reliance Group Ambani: अंबानी 'या' देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी घेणार विकत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com