PIB FACT CHECK: आरबीआयने २००० रूपयांच्या नोटा चलनातून माघारी घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच केला होता. पण त्या कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून वैध राहतील. याचा अर्थ असा की, या नोटा व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि त्या बँकांमध्ये जमा किंवा बदलून घेता येऊ शकतात. अशातच सोशल मीडियावर ५०० रूपयांच्या नोटासंदर्भात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
आरबीआय ५०० रूपयांच्या नोटा मार्च २०२६ पासून बंद करणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. पीआयबीने या व्हायरल मेसेजचे फॅक्ट चेक केलेय. त्यामध्ये हा दावा खोटा असल्याचे समोर आलेय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ५०० रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यावर पीआयबीकडून फॅक्ट चेक करण्यात आलेय.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांच्या एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा काढणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. 75% बँकांच्या एटीएममधून 500 च्या नोटा हटवल्या जाव्यात आणि 31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएममधून या नोटा पूर्णपणे बंद व्हाव्यात, असा उद्देश आहे. यानंतर एटीएममधून फक्त 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच उपलब्ध असतील. त्यामुळे, तुमच्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या नोटा आता खर्च करायला सुरुवात करा, असा मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
५०० रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा दावा PIB फॅक्ट चेकने पूर्णपणे खोटा ठरवला आहे. PIB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट करत तथ्य सांगितलेय. आरबीआयने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. 500 रुपयांच्या नोटा अद्यापही कायदेशीररित्या वैध आहेत. कोणत्याही माहितीची सत्यता तपासण्यासाठी सरकारी वेबसाइट्ससारख्या विश्वसनीय स्रोतांचा वापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.